Best Buffalo: या चार जातींच्या म्हशीचे पालन करून कमी वेळात बना जास्त श्रीमंत! बघा काय आहेत म्हशींची नावे

Best Buffalo: महाराष्ट्र राज्य हे दूध उत्पादनाच्या बाबतीत एक अग्रगण्य राज्य राहिलेले आहे व मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र मध्ये व्यवसाय पातळीवर दूध उत्पादनाची शृंखला चालू झालेली आहे. शेतीबरोबर जोडधंदा करून शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला दुग्ध व्यवसाय मदत करत असतो म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण जास्त दूध देणाऱ्या म्हशी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

दूध उत्पादनासाठी गाईंच्या तसेच म्हशींच्या अनेक जाती उपलब्ध आहे परंतु चांगल्या जातीच्या जनावरांची निवड करणे हे दूध व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. गाईंच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला जास्त मागणी बघायला मिळते व परिणामी म्हशीच्या दुधाला जास्त भाव मिळतो. आपण अशा काही प्रगत म्हशींच्या जाती बद्दल माहिती घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला म्हशीच्या दूध उत्पादनामध्ये वाढ बघायला मिळेल.

मुऱ्हा

देशभरामध्ये अनेक पशुपालक मुऱ्हा जातीच्या म्हशी चे पालन करत असतात. पंजाब हरियाणा तसेच विदेशामध्ये देखील मुऱ्हा म्हशीचे पालन केले जाते मुऱ्हा म्हशीचे वैशिष्ट्य म्हणजे मुऱ्हा म्हशीचे दूध घट्ट असते व दुधाला दुधाला जास्त फॅट असते देशातील अनेक देशी म्हशींच्या तुलनेमध्ये मुऱ्हा म्हैस सरस ठरते. या म्हशीच्या वैशिष्ट्यांमुळे मध्य प्रदेश सरकारकडून संबंधित म्हैस खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना व पशुपालकांना अनुदान दिले जाते.

जाफराबादी म्हैस

जाफराबादी म्हशीचे मूळ उगम स्थान हे गुजरात मधील जाफराबाद आहे ज्यामुळे गुजरात महाराष्ट्र आणि देशाच्या काही भागांमध्ये जाफराबादी म्हशीचे संगोपन केले जाते. दूध उत्पादक जाफराबादी म्हशीला पसंती देताना बघायला मिळतात कारण ही म्हैस जास्त दूध देते. जाफराबादी म्हैस 25 ते 30 लिटर दूध देऊ शकते. वजनाने जड असलेली ही म्हैस आपल्या अधिक दूध उत्पादनामुळे दूध उत्पादकांची पसंती बनलेली आहे.

सुरती म्हैस

गुजरात आणि गुजरातच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरती म्हशीचे वास्तव्य बघायला मिळते. सुरती म्हशीचे डोके लांब असते व ही म्हैस वजनाने हलके असते. सुरती म्हशीला इतर म्हशीच्या तुलनेत कमी खाद्य लागते त्यामुळे कमी खाद्यामध्ये जास्त दूध देणाऱ्या म्हशी मध्ये सुरती म्हशीची गणना होते.

भदावरी म्हैस

भदावरी म्हैस दुधाला असल्यामुळे अनेक शेतकरी भदावरी म्हशीचे पालन करतात. ही म्हैस मुराह म्हशीपेक्षा कमी दूध देत असली तरी भदावरी म्हशीचे तूप हे चांगले मानले जाते व उत्तम दर्जाच्या दुधासाठी भदावरी म्हशीचे पालन केले जाते

वरील म्हशी शिवाय अनेक म्हशी महाराष्ट्र मध्ये पालन केले जातात ज्यामध्ये पंढरपुरी, मेहसाणा, मुराह इत्यादी म्हशींचा समावेश होतो. प्रत्येक म्हशीचे हे आपले वेगळे वैशिष्ट्य असते व त्यामुळे वेगवेगळ्या कारणांसाठी म्हशी चे पालन केले जाते.

मला आशा आहे तुम्हाला आजच्या या लेखांमध्ये जास्त दूध देणाऱ्या म्हशी विषयी माहिती मिळाली असेल जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता व अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

हे पण बघा

Havaman Live: पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस, पंजाब डख यांचा हवामान अंदाज

वेबसाईट कशी तयार करायची

IMD Update: हवामान विभागाची मोठी अपडेट ! या भागात पाऊस पडणार, आजचा नवीन हवामान अंदाज जाहीर

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा