सध्या सोन्याच्या आणि चांदीच्या दारामध्ये दररोज बदल होताना बघायला मिळत आहे दिवाळी लवकरच आलेली असताना लोकांचा सोने खरेदी कडे कल वाढलेला बघायला मिळत आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दिवाळीमध्ये सोन्याच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे. बाजारामध्ये सध्या सोने खरेदीसाठी आणि चांदी खरेदीसाठी गर्दी वाढत आहे त्यामुळे आत्ताचे नवीन सोन्या-चांदीचे दर जाणून घेणे गरजेचे ठरते.
मागील महिन्याच्या शेवटला व या महिन्याच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. परंतु दोन आणि तीन नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दारामध्ये परत काहीसी वाढ झाल्यानंतर आता 4 नोव्हेंबर रोजी परत सोन्याचे दर शंभर रुपयांनी घसरले. सध्या 22 कॅरेटच्या एक तोळ्याच्या सोन्याचा दर 56,650 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,790 प्रति तोळा म्हणजेच दहा ग्रॅम इतका आहे.
मागच्या आठवड्यामध्ये चांदीच्या दरामध्ये तब्बल बाराशे रुपयांची घसरण झाली होती परंतु दोन नोव्हेंबर रोजी चांदीच्या दरामध्ये 700 रुपयांनी वाढ झाली त्यानंतर परत तेवढीच घसरन देखील झाली परंतु आता परत चांदीच्या दरामध्ये नऊशे रुपयांनी वाढ झालेली आहे.
सराफा बाजारामध्ये संबंधित सोन्या-चांदीची आभूषणे बनवण्यासाठी मजुरी तसेच अन्य शुल्क लागू होत असतात त्यामुळे संबंधित दुकानांमध्ये सोना चांदीच्या दरात काहीशी तफावत बघायला मिळू शकते तसेच जर तुम्ही सोने तसेच चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही संबंधित धातूंची गुणवत्ता तपासणी गरजेचे ठरते व सोन्याच्या दागिन्यावरील हॉलमार्क शिका जरूर बघावा.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा