गुंतवणूक करण्याआधी बघा पोस्ट ऑफिस, RD आणि PPF मध्ये मिळतेय इतके व्याज

सुरक्षित आणि नियमित उत्पन्न देणाऱ्या योजना मध्ये पोस्ट ऑफिस RD आणि PPF कडे बघितले जाते. सरकार मार्फत चालवण्यात येणाऱ्या या योजनांमध्ये सुरक्षित पद्धतीने रिटर्न मिळत असतात. सामान्य नागरिकांना गुंतवणुकीच्या अधिक ज्ञानाशिवाय संबंधित योजनांमधून नफा कमावता येऊ शकतो.

पोस्ट ऑफिस, RD आणि PPF यांना आपण गवर्नमेंट मार्फत चालवण्यात येणाऱ्या स्मॉल सेविंग स्कीम म्हणू शकतो. सामान्य नागरिकांच्या पैशांची बचत व्हावी हा स्मॉल सेवींग स्कीम चा उद्देश असतो. स्मॉल सेविंग स्कीम मध्ये सामाजिक सुरक्षा योजनेचा देखील समावेश होतो ज्यामध्ये जेष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेचा समावेश होतो.

स्मॉल सेविंग स्कीम चा व्याजदर

बचत खातं – ४ टक्के

२ वर्ष साठी पोस्ट ऑफिस एफडी – ७ टक्के

३ वर्ष साठी पोस्ट ऑफिस एफडी – ७ टक्के

५ वर्ष साठी पोस्ट ऑफिस एफडी – 7.5 टक्के

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र – ७.७ टक्के

ज्येष्ठ नागरिक बचत योजना – ८.२ टक्के

मासिक उत्पन्न योजना – ७.४ टक्के

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी – ७.१ टक्के व्याजदर

१ वर्ष साठी पोस्ट ऑफिस FD – ६.९ टक्के

५ वर्ष साठी RD – ६.७० टक्के

सुकन्या समृद्धी खाते – ८ टक्के

आपण वरती नमूद केलेल्या योजनांमध्ये पैसे गुंतवून एक सुरक्षित गुंतवणूक करू शकाल. गुंतवणूक करत असताना संबंधित अधिकाऱ्यांशी उपयुक्त योजनेविषयी स्पष्ट बोलून माहिती जाणून घ्या. तसेच संबंधित योजनेबद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊन मगच गुंतवणूक करा

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा