Havaman Andaj: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडीप चालूच आहे. काही काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी शेतकरी अजून देखील चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील विविध भागातील शेतकरी पावसाची आस धरून आहेत.
Havaman Andaj: काही तासात विविध जिल्ह्यांत पाऊस
आत्ताच प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत असला तरी उर्वरित महाराष्ट्रात पावसाने दड्डी मारली आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबले आहेत व बळीराजा चिंतातूर झाला आहे.
प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील काही तासांमध्ये पूर्व विदर्भ आणि उत्तर विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होताना बघायला मिळत आहे अशातच ही बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकते.
आजचा हवामान अंदाज
जळगाव आणि धुळ्याच्या आसपासच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीत बाहेर जाताना खबरदारी घ्यावी अशी सूचना देण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार ठाणे सिंधुदुर्ग या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर नाशिक, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, पालघर या भागांमध्ये भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच ठिकाणी आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. महाराष्ट्र राज्यात ठीक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दररोज चा हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून ग्रुप जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा