Havaman andaj : आज दुपारनंतर महाराष्ट्रातील या १४ जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता

Havaman andaj : आज महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस जोर वाढणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच रिमझिम पावसाची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये दुपारी आणि दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर राहील तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये रात्रीपर्यंत जोर वाढणार आहे हे आजच्या हवामान अंदाजात जाणून घेऊया.

नागपूर विभाग, अमरावती भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आपल्याला मिळत आहे. सर्वदूर हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे तर काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल. सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता जरी नसली तरी पण ठीक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. दुपारी आणि दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढणार आहे याविषयी अधिक माहिती पुढे बघणारच आहोत

नाशिक विभाग, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण आहे. काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल. पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये पश्चिम भागामध्ये कोकणालगतच्या भागांमध्ये पावसाचा जोर राहील. पूर्वी भागामध्ये बहुतांश भागांमध्ये पावसात जोर कमी आहे. ठीक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो

विदर्भ आणि मराठवाडा हवामान अंदाज

मराठवाड्यात देखील मित्रांनो आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे बहुतांश भागांमध्ये जागा बदलत पाऊस होण्याची शक्यता देखील आहे. काही काही ठिकाणी सकाळीच हलक्या पावसाची हजेरी लावण्याची शक्यता आहे. दुपारी आणि दुपारनंतर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भातील नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सकाळी सुद्धा काही ठिकाणी मध्यम पावसात शक्यता आहे. त्यामध्ये कापसी आणि आसपासच्या भागांमध्ये मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. सकाळपासूनच रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो विखुरलेल्या स्वरूपात वातावरण जरी असले तरी पण काही ठिकाणी सर्वदूर असा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो.

Havaman andaj आज कुठं पडणार चांगला पाऊस

दुपारी आणि दुपारनंतर विदर्भात काही भागांमध्ये पाऊस जोर वाढणार आहे त्यामध्ये नागपूर, उमरेड आणि आसपासचा परिसर येथे मध्यम पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळतो. भंडारा आणि गोंदियाच्या काही परिसरामध्ये मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. घोटी, वारासणी या भागांमध्ये दुपारी आणि दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसेच दक्षिण भागातील जिल्हे चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये मध्यम पावसाचे वातावरण आहे तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.

अमरावती विभागांमध्ये पूर्वी भागातील जिल्ह्यांमध्ये पावसाचे स्वरूप बघायला मिळेल त्यामध्ये आर्वी, पुलगाव, मोझरी या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळ आणि वाशिम च्या काही परिसरामध्ये हलक्या रिमझिम पावसाची शक्‍यता आहे.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हवामान अंदाज

मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालनाच्या उत्तरे परिसरामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. कन्नड, मालेगाव, मनमाड, सिल्लोड या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता. हिंगोली मध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे.

अहमदनगर मध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आज दुपारनंतर थोडासा वातावरणात बदल होणार आहे. जुन्नर पासून तर बीड पर्यंत हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. जुन्नरच्या काही परिसरामध्ये पश्चिम भागामध्ये एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस देखील होऊ शकतो. मित्रांनो पुणे विभागामध्ये आजही पावसाचा जोर कमी राहणार आहे. कोकणामध्ये आणि कोकणालगतच्या भागांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर च्या कोकणालगत परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता.

महाराष्ट्र हवामान अंदाज

सोलापूर मध्ये काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता त्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत सोलापूर आणि पंढरपूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. कोकणामध्ये आजही हलक्या मध्यम पावसाची शक्यता. जोरदार पाऊस शक्यता बहुतांश भागांमध्ये कमी आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोकण विभाग, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये राहण्याची शक्यता

दररोजचे हवामान अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

3 thoughts on “Havaman andaj : आज दुपारनंतर महाराष्ट्रातील या १४ जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता”

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा