Havaman andaj: कोकण तसेच घाट माथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे लोकांची तारांबळ उडालेली आहे व धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पावसाची संततदार सध्याही सुरूच आहे. महाराष्ट्र राज्यातील उर्वरित ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे.
गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी पुणे, साताऱ्याचा घाटमाथ्यावरचा परिसर, रत्नागिरी तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली ला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला होता. तर उर्वरित कोकणाचा परिसर नागपूर, गोंदिया, भंडारा ज्या जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता. उत्तर महाराष्ट्र उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागांना जोरदार पावसाच्या इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आलेला होता.
Havaman andaj | आज महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता
सर्वत्र जोरदार पावसामुळे सर्व सामान्यांचे दाणादाण उडाली व राज्य सरकार मार्फत एनडीआरएफच्या १३ तुकड्या राज्यभरात ठिकठिकाणी तैनात करण्यात आली ही माहिती समोर येत आहे.
आज 28 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य ठिकठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागामार्फत देण्यात आलेले आहे. आज विदर्भ, मराठवाडा, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र या सर्व भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच 29 जुलैपासून महाराष्ट्रात सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने सांगितलेली आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र तसेच कर्नाटकच्या किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र बरोबरच ओडिषा, तेलंगाना, आंध्र प्रदेश या राज्यांना देखील आज अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आलेला आहे.
दररोज चा हवामान अंदाज व्हाट्सअँपच्या मोफत अपडेटच्या स्वरूपात मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा