Havaman andaj: हवामान विभागाने १५ ते १७ तारखेला या जिल्ह्यांना दिला अलर्ट

Havaman andaj: शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी हवामान विभागाने दिलेली आहे की पुढील 15 ते 17 तारखेला विविध जिल्ह्यांना पाऊस पडण्याचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत म्हणूनच अशा परिस्थितीत हा हवामान अंदाज शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे.

मागील महिन्यामध्ये पडलेल्या पावसाच्या मोठ्या गॅप मुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये सात ते दहा तारखेच्या दरम्यान पडलेल्या मुसळधार पावसामुळे पावसाची तूट भरून निघेल अशी खात्री शेतकऱ्यांना वाटत होती परंतु परत मध्ये पावसाचा गॅप पडल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे.

Havaman andaj – चक्रीवादळ सक्रिय

हवामान शास्त्रज्ञ शिल्पा आपटे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखीनच सक्रिय होणार आहेत. शिल्पा आपटे या पुणे हवामान विभागामध्ये हवामान शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

संबंधित कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव हा संपूर्ण महाराष्ट्रावर राहणार असला तरी कोकण विभाग, पुणे, साताऱ्याचा कोकणालगत चा भाग आणि महाराष्ट्रातील घाठमाथाच्या परिसरावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुढील 48 तासांमध्ये कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड मध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Rain forecast

मराठवाड्यामधील हिंगोली आणि परभणी तसेच विदर्भ मधील भंडारा गोंदिया आणि गडचिरोली येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मध्य महाराष्ट्र मध्ये देखील तुरळक ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

एकंदरीत बैलपोळ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. आता बैलपोळ्याच्या मुहूर्तावर दिलेला हवामान अंदाज बघून पुढील काही दिवसात महाराष्ट्रात खरंच पाऊस पडतो की नाही हे पाहण्यासारखे राहील.

दररोज चा हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Indian meteorological department Maharashtra

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा