Havaman Andaj: विदर्भ तसेच मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे परंतु आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे वायव्य दिशेकडे पुढे सरकल्यामुळे आता महाराष्ट्र मध्ये पावसाचा जोर विदर्भ वगळता इतर ठिकाणी कमी होण्याचा संकेत हवामान विभागाने दिलेला आहे.
आज सोमवारी विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान आलेले आहेत तसेच पुढील 24 तासांमध्ये अकरा जिल्हा अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे आजच्या हवामान अंदाज मध्ये याविषयी आपण माहिती जाणून घेऊया.
Havaman Today: आजचा हवामान अंदाज
भारतीय हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार ओडिसा किनारपट्टी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते ते वायव्य दिशेकडे पुढे सरकलेले आहे अशातच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे राज्याच्या भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील.
वर्धा मध्ये 148 मिलिमीटर पावसाची नोंद
रविवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी नोंदवलेल्या 24 तासांमध्ये 148 किलोमीटर पावसाची नोंद झाली त्या खालोखाल गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि बुलढाणा मध्ये पावसाची नोंद झाली. मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर जास्त नव्हता तर उदगीर मध्ये देखील नऊ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. यामध्ये विदर्भामधील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा तसेच अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे
मोफत हवामान अपडेट व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा