Humani Management: मागील काही वर्षांपासून बदलत्या हवामानामुळे आणि वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांमुळे पिकांवरती हुमणीचा प्रादुर्भाव वाढलेला बघायला मिळत आहे त्यामुळे वेळीच हुमणीचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे ठरते. ज्वारी, भात, ऊस, हरभरा, गहू, तसेच अनेक अन्य पिकांमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव आढळून येतो.
हुमणी ही मुख्यता दोन प्रकारचे असते ज्यामध्ये holotrichia serrata या प्रजातीची हुमनी आपल्याला अहमदनगर, नांदेड, धुळे, सांगली, कोल्हापूर तसेच बुलढाणा जिल्हा मध्ये आढळून येते याचबरोबर हुमणीची आणखी एक प्रजाती आहे जी म्हणजे लोकोपोलिस लेपिडोफोरा जिचा सांगली आणि कोल्हापूर मध्ये प्रादुर्भाव बघायला मिळतो.
ज्या पिकांना जास्त पाण्याची आवश्यकता असते किंवा दमट ओलसर जमिनीमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव मुख्यतः आढळून येतो म्हणूनच विविध बागायती पिकांमध्ये उसामध्ये आपल्याला हुमण्याचा प्रादुर्भाव बघायला मिळू शकतो.
हुमणीच्या मुख्यतः चार जीवन अवस्था आहे ज्यामध्ये अंडी, अळी, कोश आणि पतंग यांचा समावेश होतो. या सर्व अवस्थांमध्ये होण्याची अडी अवस्था ही सर्वात जास्त नुकसान कारक असते व हुमणीची अळी अवस्था सहा ते आठ महिने इतकी मोठी असते.
हुमणीचे नियंत्रण कसे करायचे जाणून घ्या | Humani management
हुमणीच्या सर्व जीवन अवस्थांमध्ये पतंग ही जीवन अवस्थाच फक्त जमिनीच्या वरती असते त्यामुळे आपण भुंगेऱ्यांचे किंवा पतंगांचे नियंत्रण करणे गरजेचे ठरते ज्यामुळे हुमणीच्या पुढील जीवनमानाला आळा घालता येतो
हुमणीच्या अळीचे नियंत्रण Humani Management
खोल नांगरट करावी व त्यानंतर नांगरटीच्या वेळेस बाहेर पडणाऱ्या अळ्या या गोळा करून रॉकेल पाण्यामध्ये टाकून त्यांचा नायनाट करावा. आपण खुरप्याच्या किंवा हूकाच्या साह्याने मशागत करत असताना हुमणीच्या अळ्या मारू शकतो .
metarhizium anisopliae हे बुरशीजन्य कीटकनाशक आपण वीस किलो प्रती हेक्टर या प्रमाणामध्ये कुजलेले शेणखत त्यामध्ये मिसळून घ्यावे व त्यानंतर संबंधित मिश्रण हे झाडाच्या बुंध्यापाशी टाकावे वरून पाण्याचे हलके ड्रेंचींग द्यावे.
हुमणीच्या पतंगांचे सामायिक नियंत्रण
जेव्हा पावसाळ्यातील पहिला पाऊस पडतो त्यानंतर हुमणीचे पतंग हे लिंब, बाभूळ, बोर या झाडांवरती पाने खाण्यासाठी गोळा होतात अशा वेळेस आपण रात्रीच्या वेळेस काठीच्या सहाय्याने फांदी हलवून भुंगेरे गोळा करावेत व रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये टाकून त्यांचा प्रतिबंध करावा यामुळे भुंग्याऱ्यांचा अंडी घालण्यापूर्वी नायनाट करता येईल.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख पुढे शेअर करा व या लेखात जर काही कमतरता असेल किंवा हुमनी विषयी काही शंका असतील तर कमेंटच्या माध्यमातून कळवा.
हे पण वाचा:
आंब्यामधील फळ पोखरणाऱ्या अळीची लक्षणे व उपाय योजना (Mango fruit borer)
वांगी पिकावरील तपकिरी तुडतुड्यांची लक्षणे व नियंत्रण
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा