IMD update: ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाने दडी मारलेली होती व त्यानंतर हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडेल असे आपल्या हवामान अंदाज सांगितले होते त्यानुसार सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाला सुरुवात झाली परंतु आता कालपासून राज्यभरातून पाऊस गायब झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
सप्टेंबर महिन्यामधील पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला व त्यानुसार ठीक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आता एक दोन दिवस पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे त्यामुळे जवळपास सर्वच जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कमी दाबाचे क्षेत्र ईशान्य दिशेकडे सरकल्यामुळे हा परिणाम झाला असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
IMD update: दोन दिवस असा असेल पावसाचा प्रवास
दरम्यान आज आणि उद्या महाराष्ट्रात कुठेही चांगला पाऊस जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज असला तरी बुधवारपासून अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे व बुधवारपासून राज्यात परत जोरदार पाऊस पडेल अशी खात्री हवामान खात्याने दिलेली आहे.
महाराष्ट्र राज्यात पावसाला सुरुवात झालेली असली तरी अजूनही काही भागांमध्ये चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे व पावसावाचून शेतकऱ्यांची पिके कोमजली आहेत. ठिकठिकाणी शेतकरी वरून राजाला चांगला पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करत आहे तर काही भागांमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे.
दररोजचा हवामान अंदाज व्हाट्सअप च्या माध्यमातून मोफत मिळवण्यासाठी आत्ताच आम्हाला उजव्या साईडला असलेल्या व्हाट्सअप ग्रुप च्या लिंक वर क्लिक करून जॉईन करा.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा