IMD Update: बिपरजॉय चक्रीवादळाचा महाराष्ट्र सह संपूर्ण भारताच्या वातावरणावर परिणाम होत आहे. गुजरातच्या किनाऱ्यावर धडकलेल्या या वादळामुळे भारतात कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी स्थिती झाली आहे. हवामान विभागाने या पार्श्वभूमीवर नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे यामध्ये महाराष्ट्रात मान्सून आणखी लांबण्याचा इशारा देण्यात आला आहे. नवीन हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सून 23 जून नंतर हजर होण्याची शक्यता आहे.
देशामध्ये आणि महाराष्ट्र मध्ये ठीक ठिकाणी होणारा पाऊस हा बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम आहे. ईशान्य आणि दक्षिण भारतामध्ये 18 ते 21 जूनच्या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच महाराष्ट्रासह मध्ये आणि मध्य भारतात 23 जून पासून पुढे पाऊस होण्याची शक्यता नोंदवली आहे.
IMD Mansoon Update of Maharashtra
हवामान विभागांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार या आठवड्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. परंतु पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. चक्रीवादळामुळे दूर लोटलेला पाऊस आणखीन काही दिवस रखडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी येत्या काही दिवसात पेरणी करताना काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आलेला आहे.
तळ कोकणामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे परंतु महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अजून पाऊस झालेला नाही त्यामुळे राज्यातील बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि इतर भागांमध्ये पाऊस होण्यासाठी अजून काही दिवस वाट बघावी लागणार आहे.
यंदा पाऊस लांबला, शेतकऱ्यांची चिंता वाढली
यंदा भारतामध्ये दरवर्षीच्या तुलनेत उशिरा पावसाची हजेरी झाली त्यातच बिपरजॉय चक्रीवादळ हजर झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता जोरदार वाऱ्यासह चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे देशात तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देशात मान्सूनचे आगमन होते परंतु यावर्षी मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होती. आता निम्मा जून महिना संपला तरी महाराष्ट्रात पाऊस पडलेला नाही त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत कारण जर जून महिन्यात पावसाला विलंब झाला तर संपूर्ण खरीप हंगामावर वाईट परिणाम दिसून येतो.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा