KCC Update जर तुम्हाला बँकेमधून किसान क्रेडिट कार्ड चे कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचा कागद देण्याची गरज पडणार नाही यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता व कर्जाचे पैसे तुम्हाला सेल्फ सर्विस मोड द्वारे तुमच्या दारामध्ये वितरित केली जातील.
रिझर्व बँक ऑफ इंडिया ने किसान क्रेडिट कार्ड साठी हे अपडेट जाहीर केलेले आहे. या अपडेट मुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी सहजपणे कर्ज मिळू शकते व यासाठी किसान क्रेडिट कार्ड कर्ज पूर्णपणे डिजिटल करण्यात आलेली आहे. किसान क्रेडिट कार्डचे डिजिटलायझेशन करण्यासाठी रिझर्व बँकेचा एक प्रथमदर्शी प्रकल्प सुरू झाला आहे व अनेक राज्यांमध्ये याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
KCC Update: किसान क्रेडिट कार्डचे डिजिटलायझेशन म्हणजे काय
किसान क्रेडिट कार्डचे डिजिटलायझेशन म्हणजे तुम्हाला कर्जासाठी बँकांमध्ये कागदपत्रे जमा करण्याची गरज पडणार नाही. बँक तुमचा डेटा डिजिटल माध्यमातून जमा करेल व त्याद्वारे बँकांना तुमच्या कागदपत्रांची माहिती देखील मिळेल. याचबरोबर बँकेमध्ये स्वतंत्र पद्धतीने कागदपत्रे जमा करण्याची व त्याच्या पडताळणीची काळजी करण्याची देखील तुम्हाला गरज पडणार नाही. यामुळे कर्ज कोणत्याही अडथळा शिवाय कमी वेळेत जमा होईल.
किसान क्रेडिट कार्ड हे डिजिटल झालेले आहे परंतु हे सध्या संपूर्ण देशात लागू होत नाही. जेथे पायलेट प्रोजेक्ट चालू आहे अशा राज्यांमध्ये किसान क्रेडिट कार्ड डिजिटल केले जात आहे. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा समावेश होतो व या प्रणालीचा संबंधित राज्यांमध्ये चांगला फायदा बघायला मिळत आहे.
डिजिटल कर्जाची काय गरज आहे
आतापर्यंत कर्ज घ्यायचे म्हणले तर शेतकऱ्यांना बराच वेळा बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे मागितले जात होती व काही वेळेस ते दलालांच्या तावडीतही अडकत होते त्यामुळे कर्ज मिळण्यास उशीर होत होता व त्याचा परिणाम शेतीवर होत होता या सर्व परिस्थिती पासून वाचण्यासाठी सरकारमार्फत व रिझर्व बँकेमार्फत डिजिटल कर्ज प्रणाली समोर आली आहे.
किसान क्रेडिट कार्ड प्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज ऑनलाइन मिळत आहे यामध्ये पर्सनल लोन मध्ये ग्राहकाला कोणताही कागद द्यावा लागत नाही काही मिनिटांमध्ये पैसे खात्यात येतात. व अशीच काहीशी सुविधा आता किसान क्रेडिट कार्ड साठी देखील तयार करण्याची प्रणाली सुरू आहे
अशाच प्रकारची वेगवेगळी अपडेट व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा
स्रोत: किसानराज
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा