मोबाईल वरून काही मिनिटांत जमिनीची मोजणी करायला शिका

Land records: जमिनीची मोजणी करायची म्हटली की त्यासाठी विविध सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाठी मारू लागतात व त्यामुळे आपला वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात जात असतो व अशा परिस्थितीमध्ये घरबसल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी आपण मोबाईल वरून जमिनीची मोजणी करू शकतो.

जमिनीची मोजणी करण्यासाठी रोव्हर यंत्र प्रणालीचा उपयोग केला जातो ज्यामध्ये जमिनीची मोजणी केली जाते ज्यामुळे जमीन मोजणी मध्ये पारदर्शकता येते. कमी वेळेमध्ये जमिनीची मोजणी करण्यासाठी हे यंत्र उपयोगी आहे व यामुळे वेळ व पैसा यांची बचत होते. परंतु तुम्हाला माहित आहे का आपण मोबाईल वरून देखील जमिनीची नोंदणी करू शकतो.

जमिनीची मोजणी करण्यासाठी मोबाईल वरून ॲपच्या सहाय्याने तुम्ही जमीन मोजणी करू शकता. जमिनीची मोजणी करण्यासाठी ॲपच्या सहाय्याने काही स्टेप्सचा अवलंब करावा लागतो त्यामुळे संबंधित स्टेप्स पुढील प्रमाणे आहेत.

स्टेप 1: गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअर वरून जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर नावाचे एप्लीकेशन डाउनलोड करा.

स्टेप 2: संबंधित एप्लीकेशन ओपन करा परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा हे ॲप्लिकेशन चांगल्या प्रकारे चालण्यासाठी तुमचे जीपीएस ऑन असणे गरजेचे आहे तसेच तुमचा इंटरनेटचा स्पीड देखील चांगला असणे गरजेचे ठरते.

स्टेप 3: जीपीएस एरिया कॅल्क्युलेटरच्या सेटिंग मध्ये जाऊन व त्यामध्ये एरियामध्ये तुम्हाला एकर चा ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करा.

स्टेप 4: सर्व सेटिंग चा व्यवस्थितपणे अवलंब केल्यानंतर तुम्हाला एक त्रिकोणी चिन्ह दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. या ठिकाणी जीपीएस निवडा हा पर्याय निवडा व त्यानंतर तुम्हाला प्लस च्या चिन्हावर क्लिक करायचे आहे.

स्टेप 5: आता जमिनीची मोजणी करण्यासाठी तुम्हाला जिथून सुरुवात करायची आहे तिथे उभे रहा व त्यानंतर मोबाईल मध्ये प्लस च्या चिन्हावर क्लिक करून शेतात फिरवून याचा ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला सरळ चालत जायचे आहे व जर तुम्हाला वळायचे असेल तर परत प्लस च्या चिन्हावर क्लिक करा.

स्टेप 6: सर्व शेताचा फेरफटका मारून झाल्यानंतर तुमच्या जमिनीचे क्षेत्रफळ तुम्हाला कळू शकते व त्याद्वारे तुम्ही जमिनीची मोजणी करू शकाल.

अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या मोफत व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा.

Onion export news marathi

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा