लेक लाडकी योजना फॉर्म, कागदपत्रे, अर्ज कुठे करायचा, नियम आणि पात्रता

Lek Ladki Yojana Mahiti : 1 एप्रिल 2023 रोजी लेक लाडकी योजना या योजनेची घोषणा करण्यात आली या अंतर्गत मुलींना अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1 लाख 1 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. लेक लाडकी योजना अंतर्गत विविध स्तरांमध्ये मुलींना मदत केली जाईल त्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपयांची मदत केली जाईल.

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गातील मुलींना आर्थिक मदत मिळावी तसेच बरेच वेळेस मुलींचे अठरा वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पुढील शिक्षण पैशाअभावी पूर्ण केले जात नाही आणि त्यांचे लग्न लावून दिले जाते हे सर्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाकडून मुलींसाठी ही योजना राबवण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील ज्या कुटुंबीयांकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत की लेक लाडकी योजना काय आहे तसेच लेक लाडकी योजना साठी अर्ज कसा करायचा याचबरोबर इतर महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

लेक लाडकी योजना • lek ladki yojana mahiti

लेक लाडकी योजना महाराष्ट्र शासनाची योजना आहे त्या अंतर्गत महाराष्ट्रातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत विविध स्तरांवरती केली जाते. ज्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपयांची मदत केली जाते.

जेव्हा मुलगी शाळेत जाण्यासाठी सुरुवात करेल तेव्हा मुलीला 6 हजार रुपयांची मदत केली जाईल तसेच मुलगी सहावीत गेल्यानंतर 7 हजार रुपयांची आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर 8 हजार रुपयांची मदत केली जाईल. मुलगी 18 वर्षांची सज्ञान झाल्यानंतर 75 हजार रुपयांची मदत दिली जाईल अशा प्रकारे संपूर्ण एक लाख एक हजार रुपयांचा निधी मुलीसाठी तरतूद करण्यात आली आहे.

लेक लाडकी योजना 2024 माहिती (Lek Ladaki Yojana)

योजनेचे नावलेक लाडकी योजना
योजनेचे उद्दिष्टराज्यातील आर्थिक दृष्ट्या मागे असलेल्या कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत आणि त्याद्वारे शिक्षणातील मुलींचा सहभाग वाढवणे
लेक लाडकी योजनेचे लाभार्थीराज्यातील पिवळे तसेच केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुली
योजनेची सुरुवातमार्च 2023 च्या अधिवेशनात
संपूर्ण आर्थिक सहायत्ताएक लाख एक हजार रुपये
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाइन / ऑफलाईन
योजनेचा विभागमहिला तसेच बाल कल्याण मंत्रालय महाराष्ट्र शासन
हेल्पलाइन नंबरUpdated Soon

लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट

  1. मुलींना शिक्षणामध्ये समान संधी उपलब्ध करून देणे
  2. शिक्षण क्षेत्रामध्ये मुलींचे योगदान वाढवणे तसेच मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करणे
  3. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील मुलींना शैक्षणिक खर्चासाठी मदत उपलब्ध करणे
  4. मुलींना चांगली शिक्षण उपलब्ध करून देऊन स्वावलंबी बनवणे
  5. मुलींचा मृत्यू दर कमी करणे आणि विविध क्षेत्रांमध्ये मुलींचे प्रमाण वाढवणे

लेक लाडकी योजना मराठी चा फायदा

  • मुलीचे अठरा वर्ष वय होईपर्यंत विविध स्तरांमध्ये एक लाख एक हजार रुपयांची मदत
  • महाराष्ट्रातील कोणत्याही आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या मुलींना याचा फायदा होईल
  • ज्या कुटुंबात जुळ्या मुली जन्माला येतील त्यांना देखील याचा लाभ मिळेल
  • योजनेची संपूर्ण राशी बँकेमध्ये ट्रान्सफर केली जाईल
  • ज्या कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल त्या कुटुंबातील फक्त मुलीला याचा लाभ मिळेल
  • मुलीला विविध स्तरांमध्ये मदत केली जाईल त्याचबरोबर मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपयांची मदत केली जाईल
  • 1 अप्रैल 2023 नंतर जन्म झालेल्या मुलींना याचा लाभ मिळेल

लेक लाडकी योजना 2024 चा लाभ

योजनाचे स्तरयोजना राशी
मुलीचा जन्म झाल्यावर5 हजार रुपये
मुलगी शाळेत पहिल्या वर्गात जाण्यास सुरुवात केल्यानंतर6 हजार रुपये
मुलगी 6 वी इयत्तेत गेल्यावर7 हजार रुपये
मुलीच्या 11 वी प्रवेश वेळी8 हजार रुपये
मुलीचे 18 वर्ष वय झाल्यावर75 हजार रुपये

लेक लाडकी योजनेचे वैशिष्ट्य

  • लेक लाडकी योजनेची राशी बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्यामुळे पालकांचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे
  • माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये बदल करून महाराष्ट्र शासनाकडून लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे
  • आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना यामुळे आर्थिक मदत प्राप्त होईल
  • जर एखाद्या दांपत्याला एक एप्रिल आधी एक मुलगा किंवा मुलगी असेल आणि दुसऱ्या मुलीचा जन्म एक एप्रिल नंतर झाला तर त्यांना याचा लाभ मिळेल
  • एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी योजना कार्य करेल
  • स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यास ही योजना मदत करेल
  • ज्या कुटुंबात जुळ्या मुलींचा जन्म होईल त्या दोन्ही मुलींना सदर योजनेचा लाभ मिळेल

लेक लाडकी योजना पात्रता

लेक लाडकी योजना पात्रता पुढीलप्रमाणे आहे:

  • लाभार्थी मुलगी तसेच लाभार्थी चे कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असावे
  • पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना याचा लाभ मिळेल
  • मुलीच्या पालकांचे बँकेमध्ये खाते असावे
  • परिवाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पर्यंत असावे
  • 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना याचा लाभ मिळेल
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील जन्मलेल्या मुलीच या योजनेसाठी पात्र राहतील
  • दुसऱ्या अपत्याला लाभ घेते वेळी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावे लागेल
  • अर्जदार पालक सरकारी नोकरीमध्ये नसावेत

लेक लाडकी योजना कागदपत्रे

  1. उत्पन्नाचा दाखला
  2. आई-वडिलांचा मुली सोबत चा फोटो
  3. आधार कार्ड
  4. पालकांचे आधार कार्ड
  5. मुली सोबतचे जॉईंट बँक खाते पासबुक
  6. पासपोर्ट साईज फोटो
  7. मोबाईल नंबर
  8. पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड
  9. रहिवासी दाखला
  10. ईमेल आयडी

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा | lek Ladaki Yojana Online Form Apply

लेक लाडकी योजना ही महाराष्ट्रातील महिला आणि बालकल्याण विभाग अंतर्गत राबविण्यात येत आहे आणि https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/ या विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती योजनेची माहिती प्रसारित केली जाते.

अद्याप लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे परंतु त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे यासाठी कोणतेही अधिकृत शासकीय संकेतस्थळ निर्माण करण्यात आलेले नाही.

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करण्याची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही व त्यासाठी ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा सध्या उपलब्ध नाही जेव्हा सरकारकडून याविषयीची अधिकृत घोषणा आणि अधिकृत संकेतस्थळ प्रसारित करण्यात येईल तेव्हा आपल्या वेबसाईट वरती त्याविषयीची माहिती अपडेट केली जाईल.

सर्वाधिक विचारले गेलेले प्रश्न

लेक लाडकी योजना काय आहे?

लेक लाडकी योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना आहे ज्या अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक स्वरूपात मदत केली जाईल.

लेक लाडकी योजनेची सुरुवात कधी झाली?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च 2023 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लेक लाडकी योजनेची घोषणा केली.

लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळेल?

महाराष्ट्र मध्ये एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ मिळेल, यासाठी विविध निकष लागू करण्यात आलेले आहेत. विविध कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आणि उपयुक्त माहिती सह अर्ज सादर केल्यानंतर लेक लाडकी योजनेचा लाभ मिळेल.

सारांश

मला आशा आहे आजच्या या लेखामध्ये तुम्हाला लेक लाडकी योजना याविषयी संपूर्ण माहिती मिळालेली असेल तसेच तुम्हाला या योजनेसाठी ची आवश्यक कागदपत्रे पात्रता आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली असेल तर तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल किंवा लेक लाडकी योजनेविषयी काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगू शकता. तसेच जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता.

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

WhatsApp ग्रुप जॉईन करा