Havaman Andaj: महाराष्ट्र मध्ये तुरळ ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे परंतु बहुतांश ठिकाणी अजूनही चांगला पाऊस पोहोचलेला नाही त्यामुळे खरीप पिके संकटात आलेले आहेत व शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत अशातच आज हवामान विभागाच्या माणिकराव खुळे यांच्यामार्फत हवामान अंदाज प्राप्त झाला आहे.
हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार आज विदर्भ आणि मराठवाड्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे संबंधित भागांमध्ये ठिकठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सध्या मान्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याशी असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा काही प्रमाणात खंड बघायला मिळत आहे.
Maharashtra Rain Update | आज पाऊस पडेल का
हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांच्यानुसार माहितीनुसार 21 ऑगस्ट नंतर बंगालच्या उपसागरामध्ये एक वातावरणीय प्रणाली निर्माण होऊ शकते. संबंधित वातावरणीय प्रणालीचे मध्य भारतामध्ये स्थितंतर होऊन त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, मुंबई तसेच विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा विविध भागांमध्ये पुढील पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा विसरलेला बघायला मिळत आहे त्यामुळे धरणांची पातळी मर्यादित झाली आहे परंतु आता पुढील तीन दिवस नाशिक आणि पुण्याच्या घाटमाथ्यावरील परिसरावर चांगला पाऊस पडण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे.
रोजचा हवामान अंदाज व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा