Homemade business : असे म्हटले जाते की ज्या वस्तूचा दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो अशा वस्तूचा व्यवसाय केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो व जेव्हा आपण अशा दैनंदिन उपयोगातील गोष्टींविषयी विचार करतो तेव्हा आपण सौंदर्यप्रसाधने किंवा खाद्यपदार्थांविषयी विचार करत असतो. त्यामुळे आज आपण अशाच दैनंदिन जीवनातील उपयोगी अशा मसाल्यांच्या व्यवसायाविषयी माहिती जाणून घेऊया.
भारतामध्ये मसालेदार आणि चटपटीत जेवण करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व त्यामुळेच भारतातील मसाल्यांना भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात खूपच जास्त मागणी असते. जगभरातील प्रचंड मागणीमुळे हा व्यवसाय भरभराटीस आलेला आहे. मसाल्यांचा व्यवसाय हा प्रत्येक ऋतूमध्ये चालणारा व्यवसाय आहे त्यामुळे या व्यवसायातून आपण वर्षभर उत्पन्न मिळवू शकतो.
सध्या लोकांमध्ये अन्नपदार्थांबाबत वाढत असलेल्या जागरूकतेमुळे सर्वत्र स्थानिक पातळीवरील मसाल्यांना मागणी वाढत आहे. स्थानिक पातळीवर उच्च गुणवत्तेचे मसाले वाजवी दरात मिळतात. म्हणूनच जर तुम्ही देखील घरबसल्या लाखो रुपये कमवून देणारा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मसाला मेकिंग युनिट कडे वळू शकता.
मसाल्याचे घटक आणि सर्वाधिक उत्पादकता असलेले राज्य
मसाल्याचा घटक | सर्वाधिक उत्पादकता असलेले राज्य |
मिरची | महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश |
हळद | तमिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओडिसा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश |
आले | उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, छत्तीसगड |
जिरे | गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश |
लवंग | राजस्थान, गुजरात |
इलायची | केरळ, कर्नाटक, तमिळनाडू |
मेथी | गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश |
जायफळ | तमिळनाडू, केरळ |
केसर | जम्मू आणि काश्मीर |
लसुन | महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक |
अजोवन | बिहार, जम्मू काश्मीर |
घरबसल्या मसाल्याचा उद्योग कसा सुरु करायचा
कच्चामाल कुठून येतो तो जाणून घेणे
व्यवसाय सुरू करण्यासाठी जागेची व्यवस्था करणे
संबंधित लायसन व कागदपत्रे प्रक्रिया
संबंधित मशिनरी विकत किंवा भाडेतत्त्वावर घेणे
कच्चा माल बोलवून उत्पादन सुरू करणे
मार्केटिंग करणे व त्यातून नफा कमावणे
घरबसल्या मसाल्याचा उद्योग सुरू करण्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या काही स्टेप चा उपयोग करू शकता व त्या स्टेपच्या आधारे तुम्ही घरबसल्या मसाल्याचा उद्योग सुरू करू शकता.
कच्चामाल कुठून येतो ते जाणून घेणे
आपण आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा आढावा घेऊन कच्चामाल कुठून येते ते जाणून घेऊ शकतो. म्हणजेच जर आपण महाराष्ट्रात राहत असाल तर आपल्याला माहित आहे की मिरचीचे उत्पादन महाराष्ट्रात ठीक ठिकाणी घेतले जाते व जर आपल्या एरियात मिरचीचे उत्पादन घेतले जात असेल तर आपण शेतकऱ्याकडून मिरची खरेदी केली तर आपला वाहतुकीचा खर्च वाचेल. तसेच कोणत्या राज्यात कोणत्या मसाल्याच्या घटकाचे जास्त उत्पादन घेतले जाते हे आपण वरील तक्त्यावरून जाणून घेतले असेल. जर आपल्याला मोठ्या प्रमाणात मसाला उत्पादन सुरू करायचे असेल तर आपण संबंधित राज्यातून संबंधित घटक खरेदी करू शकतो.
जागेची व्यवस्था करणे
कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हटला की पहिल्यांदी त्याला सुरू करण्यासाठी जागेची व्यवस्था करणे गरजेचे ठरते. मसाला व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण छोट्या जागेत देखील हा व्यवसाय प्रस्थापित करू शकतो संबंधित जागेमध्ये आपण मसाल्यांची कुटाई व पॅकिंग करून शकतो. ही जागा थोडीशी हवेशीर असल्यास फायद्याचे ठरते. जागेची व्यवस्था करताना थोडीशी ऐसपैस व महत्त्वाच्या सुविधांनी युक्त जागा असेल तर फायद्याचे ठरते.
संबंधित फूड लायसन व कागदपत्रे प्रक्रिया
जर आपल्याला स्वतःच्या ब्रँड ने मसाले विक्री करायचे असेल तर आपल्याला त्यासाठी संबंधित कागदपत्राची पूर्तता करणे गरजेचे ठरते तसेच मसाला व्यवसाय हा स्वास्थ संबंधित व्यवसाय असल्यामुळे आपल्याकडे हा व्यवसाय करण्यासाठी फुड लायसन असणे गरजेचे ठरते. जेव्हा आपला व्यवसाय एका मर्यादित क्षमतेपेक्षा जास्त वाढतो तेव्हा जर आपल्याकडे संबंधित लायसन व कागदपत्रे नसतील तर आपल्याला मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मशनरी आणि उपकरण खरेदी करणे
सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पुढील महत्त्वाचे पाऊल ठरते ते म्हणजे मशनरी आणि उपकरण खरेदी करणे आपण मशनरीच्या आधारे वेगाने मसाल्यांचे काम पूर्ण करू शकतो व आपली उत्पादकता वाढवू शकतो त्यामुळेच या व्यवसायासाठी कोणकोणत्या प्रकारच्या मशनरी आवश्यक आहेत हे आपण जाणून घेणे गरजेचे ठरते त्यासाठी पुढील चार्ट चा उपयोग करा.
मसाला मशिनरी | संबंधित मशीन चा उपयोग |
ड्रायर | मसाल्याचे घटक वाळवण्यासाठी उपयोगी |
ग्राइंडिंग मशीन | मसाल्याच्या कच्च्या पदार्थांची चांगली पावडर करण्यासाठी |
क्लिनर | उद्योगाच्या जागेतील धूळ, माती साफ करण्यासाठी |
ग्रेडर | मसाल्याच्या कच्च्या पदार्थांच्या आकारमानानुसार त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी उपयोगी |
बॅग सिलिंग मशीन | मसाल्याचे पदार्थ पॅकिंग केल्यानंतर संबंधित बॅगची शिलाई करण्यासाठी |
कच्चामाल बोलवून व्यवसाय सुरुवात करणे
कच्चामाल बोलवून आपण व्यवसायाची सुरुवात करू शकता. जेव्हा आपले कागदपत्राचे आणि मशीनची व्यवस्था पूर्ण होईल तेव्हा आपण कच्चामाल बोलून व्यवसाय सुरुवात करू शकता. सुरवातीच्या टप्प्यात जेव्हा आपण व्यवसायास सूरवात कराल तेव्हा आपण स्थानिक विक्रेत्याकडून माल खरेदी करून व्यवसाय सुरुवात करू शकता. आजच्या या स्पर्धात्मक योगामध्ये जर आपण कच्चामाल कमी दरात खरेदी केला तरच आपण मसाल्यांचे स्पर्धेमध्ये जास्त काळ टिकू शकतो.
मसाल्यांची मार्केटिंग करणे
मसाल्यांची उत्पादन करण्यापेक्षा जर कोणते महत्त्वाचे काम असेल तर ते म्हणजे मसाल्यांची मार्केटिंग करणे, मसाल्यांची चांगली मार्केटिंग केली तरच आपला व्यवसाय भरभराटीस येऊ शकतो. मसाल्यांचे मार्केटिंग करण्यासाठी आपण सध्याच्या काळात जास्त प्रमाणात वापरले जाणारे माध्यम म्हणजेच डिजिटल माध्यम जसे की युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम यांचा उपयोग करू शकतो. तसेच आपण पारंपारिक मार्केटिंग पद्धतींचा देखील उपयोग करू शकतो. ज्यामध्ये आपण जिथे मोठ्या प्रमाणात खाद्य निर्मिती केली जाते अशा व्यवसायात भेट देऊन त्यांच्याशी डील करून डायरेक्ट आपले मसाल्याचे पदार्थ त्यांना विकू शकतो.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर येथे क्लिक करून आम्हाला व्हाट्सअप ला जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा