Monsoon Update: आनंदाची बातमी, मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पावसाला सुरुवात

Monsoon Update: महाराष्ट्र मध्ये जून महिना सुरू होऊन वीस दिवस उलटून गेले तरी पाऊस झाला नव्हता. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती त्यांचे बियाणे वाया गेले, दूर लोटत असलेल्या मान्सूनमुळे शेतकरी चिंतातुर झाला होता. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे कारण महाराष्ट्र मध्ये आता पावसाला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रात हवामान विभागानुसार 23 जून पासून पावसाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मुंबईमध्ये काही ठिकाणी आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये नागपूर, नांदेड आणि इतर काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र मध्ये विविध ठिकाणी पावसाचे काळे ढग दाटून येत आहेत.

देशामध्ये आठ जूनला केरळमध्ये पावसाने हजेरी लावल्यानंतर महाराष्ट्रात देखील मान्सून लांबेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता परंतु त्यानंतर 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सून ने हजेरी लावली परंतु बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनची आद्रता कमी केली. नंतर हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 23 जून पासून विविध ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज सांगण्यात आला होता.

संपूर्ण महाराष्ट्र पावसाची वाट पाहत आहे. वर्धा मध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आला आहे तर नांदेड मध्ये देखील काही भागांत पाऊस झालेला आहे. नागपूर मध्ये काल पासून पावसाला सुरुवात झाली आहे.

उशिरा का होईना परंतु महाराष्ट्रात मान्सूनचे पाऊस सुरू झाले आहेत व त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काहीसी कमी झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधी पेरणी केली होती त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात 23 जून पासून चांगला पाऊस पडावा असे अपेक्षा सर्वजण करत आहेत.

दररोज चे हवामान अंदाज व्हाट्सअप अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा