One Rupee Pik Vima: महाराष्ट्र मध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते वारंवार होत असलेल्या या नुकसानापासून शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी सरकारकडून फक्त एक रुपयांमध्ये पीक विमा दिला जातो.
विविध पिकांसाठी एक रुपयांमध्ये विमा दिला जातो ती कोण कोणती पिके आहेत याची माहिती या लेखात आपण घेऊया तसेच या योजनेचा अर्ज भरताना विविध कागदपत्रांची आवश्यकता असते. या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी देखील या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.
फक्त एक रुपयामध्ये पिक विमा योजना
महाराष्ट्र सरकारने फक्त एक रुपयांमध्ये पिक विमा योजना देणार असल्याचा निर्णय घेतला आहे. खरीप आणि रब्बी हंगामांसाठी चालवण्यात येणारी ही योजना सलग तीन वर्षे चालणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिली. ही योजना 2023-24 ते 2025-26 या कालावधीत कार्यान्वित राहील. या योजनेमुळे महाराष्ट्रातील तळागाळातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळेल व निसर्गाच्या लहरीपणापासून काहीसे संरक्षण मिळण्यास मदत होईल.
पिक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
जर तुम्हाला फक्त एक रुपयांमध्ये पिक विमा प्राप्त करायचा असेल तर तुमच्याकडे पुढील कागदपत्रे असणे गरजेचे ठरते:
1. जमिनीचे उतारे : सातबारा, आठ – अ
2. स्वयंघोषणापत्र
3. बँक खाते पासबुक जे आधार कार्ड बरोबर संलग्न केलेले आहे
4. जर सामायिक खातेदार असाल तर संमती पत्र
या पिक विमा योजनेचा अर्ज बघितला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे नाव टाकावे लागेल त्यानंतर आधार कार्ड किंवा इतर तुमच्या स्थानाची माहिती देणाऱ्या पुराव्यानुसार तुमचा पत्ता टाकावा लागेल. जमिनीच्या उताऱ्यांच्या मदतीने तुमच्या नावावर असलेले क्षेत्र व तुमचे गाव टाकावे लागेल. तुमच्या नावावरील एकूण क्षेत्र दिलेल्या रकान्यात भरायचे आहे.
अर्जामध्ये मूग, बाजरी, सोयाबीन, उडीद, मका, तूर, कापूस, ही पिके दिलेली आहेत. तुम्हाला अर्जामध्ये मोबाईल क्रमांक आधार कार्ड क्रमांक, बँक खाते नंबर, तसेच बँकेचा संबंधित पत्ता व इतर महत्त्वपूर्ण माहिती भरावी लागेल.
कृषी अपडेट या आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
1 thought on “One Rupee Pik Vima: फक्त एक रुपया मध्ये विमा काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे”