जाणून घ्या डाळिंबातील मर रोगाची लक्षणे आणि उपाययोजना

डाळिंब पिकावरील प्रामुख्याने येणारे रोग त्यामध्ये मर रोग हा सध्याच्या काळात डाळिंब पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी यांची चिंता वाढली आहे व डाळिंब पिकावरील मर रोग एकात्मिक रोग नियंत्रण कसे करावे हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झालेला आहे आपण आजच्या लेखांमध्ये डाळिंबावरील मर रोगाचे एकात्मिक रोग व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेऊया

डाळिंबावरील मर रोग हा बुरशीच्या माध्यमातून पसरणारा रोग आहे त्याचे शास्त्रीय नाव Ceratocystis fimbriata आहे. या या रोगामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे उत्पन्न घटते.

माक्रोफोमीना, सूत्रकृमी, राहिझोक्टोनिया, फ्युझॅरीयम स्पेसिज, खोड भुंगरे, सेरॅटोसिस्टीस फिम्ब्रीआटा प्रादुर्भाव, बुरशीचा प्रादुर्भाव आणि ज्यादा प्रमाणात पाणी दिल्यामुळे सुद्धा मर रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

मर रोगाची लक्षणे

1) झाडाची पाने व फळे कोमेजून वाळतात परंतु न गळाता तशीच लटकलेली असतात

2) संपूर्ण झाडावरील पाने शेंड्याकडून पिवळी पडतात.

3) झाडाचे खोड उभे कापून पाहिले असता गाभ्यात वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे आढळतात

मर रोगाचा प्रसार

1)या रोगाचा प्रसार प्रामुख्याने जमिनीतून होतो.

2) रोपांची निर्मिती करताना बुरशीजन्य मातीचा वापर केल्यास या रोगाचा प्रसार होतो.

3) वाऱ्यामुळे सुद्धा या बुरशीचा प्रसार एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रसार होतो.

4) शेतामध्ये वापरण्यात येणारे अवजारे निर्जंतूकिकरण न करता वापरल्यास सुद्धा या रोगाच्या प्रसार होतो.

5) रोगग्रस्त रोपांमुळे या रोगाचा प्रसार होतो.

डाळिंब मर रोग व्यवस्थापन

1) डाळिंब पिकासाठी चांगली निचरा होणारी तसेच हलकी ते मध्यम प्रकारची जमिनीची निवड करावी.

2) लागवड करण्याच्या अगोदर जमीन सूर्यप्रकाशाने तापवून घ्यावी.

3) पाणी व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करावे.

4) मर रोगाने ग्रासलेले संपूर्ण वाळलेली व कोरडी झालेली झाडे उपटून ताबडतोब नष्ट करणे.

4) झाडाची छाटणी करताना पावसाळ्यात किंवा उन्हाळ्या सुरू होण्याच्या अगोदर करू नये कारण हाच काळ किडिंच्या सक्षम कालावधी असतो.

5) छाटलेल्या भागांना दहा टक्के बोर्डो पेस्ट (1किलो मोरचूर +1किलो चुना +10 ली पाणी ) लगेच लावावी.

6) भुंगेयांच्या प्रादुर्भाव दिसून आल्यास 4 किलो लाल माती /गेरू + बुरशीनाशक व कीटकनाशक 10 लिटर पाण्यामध्ये मिश्रण करणे व खोडाला पेस्ट लावणे.

7) 10 ग्रॅम कार्बनडेन्झिम घेऊन 5 लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रत्येक खड्ड्यात शिपडावे.

8) क्लोरोपायरीफॉस 50 मिली घेऊन 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून ते खड्ड्यात शिपडावे.

9) 100 ग्रॅम कॅल्शियम हायड्रोक्लोराइड प्रती खड्ड्यात टाकावे.

10) गांडूळ खत 2 किलो , शेणखत 20 किलो, निंबोळी पेंड 3 किलो, पीएसी 15 ग्रॅम, ट्रायकोडर्मा 25 ग्रॅम, अँझोटोबॅक्टर 15 ग्रॅम याचे मिश्रण करून खड्डे भरावे.

सारांश

डाळिंबावरील मर रोगामुळे डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे डाळिंब पिकावरील मर रोगाचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे असते. तसेच मर रोग होऊ नये म्हणून काही उपाययोजना करणे देखील गरजेचे असते याची माहिती आपण आजच्या या लेखातून जाणून घेतली आहे.

आजच्या लेखातून आपण जाणून घेतले की आपण कशाप्रकारे डाळिंबावरील मर रोगाचे नियंत्रण करू शकतो व अधिक उत्पन्न मिळवू शकतो जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर हा लेख शेअर करा व तुम्हाला काही शंका असेल तर लगेच कंमेंट करा

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा