Rain Update: हवामान विभागाने आज या भागांना दिलाय रेड अलर्ट, राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता

Rain Update: यावर्षी महाराष्ट्र राज्यात पावसाळा सुरू होण्यास थोडासा उशीर झाला. परंतु आता महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चांगला जोरदार पाऊस सुरू आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होऊन नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत तसेच बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामध्ये असलेल्या खालापूर येथील ईर्शाळवाडीत दरड कोसळून मोठी हानी झाली. अशातच हवामान विभागाकडून नवीन हवामान अंदाज जारी करण्यात आला आहे.

पुढील काही दिवस महाराष्ट्रात चांगला पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान विभागाने महाराष्ट्र राज्यांमधील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना रेड आणि येलो अलर्ट दिलेला आहे. या अलर्ट असलेल्या जिल्ह्यांसाठी पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहे व यासाठी राज्य शासनाने आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज ठेवलेले आहे.

कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट

रेड अलर्ट अती मुसळधार पावसाचा इशारा : पालघर, पुणे, ठाणे, रायगड

ऑरेंज अलर्ट: मुंबई व रत्नागिरी

येलो अलर्ट: नाशिक, अमरावती, बुलढाणा, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, भंडारा, नंदुरबार, चंद्रपूर, अकोला, गडचिरोली

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यावर्षी चांगला पाऊस झाला आहे 48 तासांमध्ये तब्बल 327 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी पण कायम आहे. उत्तर रत्नागिरी मध्ये खूपच जास्त पाऊस पडताना दिसत आहे तसेच 19 जुलै पर्यंत महाराष्ट्र राज्यात केवळ 58% पाऊस झाला तर राज्यांमधील धरण साठा 37 टक्क्यांवर गेला आहे.

काही ठिकाणी अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा

महाराष्ट्र मध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडत असताना काही ठिकाणी अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे कारण या ठिकाणी अजून चांगला पाऊस झालेला नाही व त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी संकटात आलेली आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही चांगला पाऊस झालेला नाही.

दररोजचा हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा