वांग्यांमधील शेंडे व फळे पोखरणारी अळी ची लक्षणे व नियंत्रण

वांग्यांमधील शेंडे व फळे पोखरणारी अळी ही वांग्याची एक महत्त्वपूर्ण कीड आहे. या अळीचे शास्त्रीय नाव Leucinodes orbonalis आहे. या अळी मुळे वांग्याचे 30 ते 50 टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी होऊ शकते. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण वांग्यामधील शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीची लक्षणे आणि त्यावरती उपाय योजना जाणून घेऊया.

शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीची लक्षणे

1. हि अळी वांग्याच्या कोवळ्या कोंबांमध्ये होल करते व त्यामुळे वांग्याचे कोंब मरतात.

2. शेंडे व फळे पोखरणारी अळी चा प्रादुर्भाव पानांच्या देठावर, पानांवर, वांग्याच्या फळावर तसेच कोवळ्या कोंबांवरती दिसून येतो.

3. या अळी मुळे वांग्याची पाने, फुल, कोंब मरतात तसेच वांग्याची फळे खाण्यासाठी अयोग्य बनतात.

4. वांग्याच्या फळांवरती होल आढळून येतात व वांग्याच्या फळांचा आकार बदलतो.

वांग्याचे शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

• शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळी ला प्रतिबंधक व्हरायटी ची निवड करा उदाहरणार्थ, पंत सम्राट, पुसा पर्पल, पुसा पर्पल लॉंग, पुसा पर्पल राऊंड

• वांग्याची पिके लागोपाठ एकाच शेतात घेणे टाळावे

• ज्या झाडांवरती शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला असे झाडे गोळा करून ती नष्ट करावी

• या किडीचा पतंग गोळा करून नष्ट करण्यासाठी हेक्टरी एक अशा प्रमाणात प्रकाश सापळ्यांचा उपयोग करावा

• वांगी काढण्याच्या वेळेस कीटकनाशकाचा उपयोग टाळावा

शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीसाठी जैविक नियंत्रण

या अळीचे जैविक नियंत्रण करण्यासाठी आपण परभक्षी कीटकांचा उपयोग करू शकतो जसे की Trichogramma chilonis चा 1.0 लाख प्रति हेक्टर या प्रमाणात उपयोग करावा. तसेच आपण B. thuringiensis var. kurstaki चा स्प्रे घेऊ शकतो.

वांग्यामधील शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीचे रासायनिक नियंत्रण

फळे पोखरणाऱ्या अळीचे रासायनिक नियंत्रण करण्यासाठी आपण वांग्याचे पीक एक महिन्याचे झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या अंतराने कीटकनाशकाची फवारणी करू शकतो.

रासायनिक नियंत्रणामध्ये आपण पुढील कीटकनाशकांचा उपयोग करू शकतो : Quinalphos 25 EC + नीम ऑईल, Fenpropathrin 30% EC, Flubendiamide 20% WG, इतर

आजच्या या लेखामध्ये आपण वांग्यावरील एक महत्त्वाची अळी म्हणजेच, फळे व शेंडे पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण आणि लक्षणे जाणून घेतली. जर आपल्याला या अळी विषयी कोणतीही समस्या असेल तर आपण कृपया कमेंट करावी व जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख शेअर करावा.

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा