Weather Update: महाराष्ट्र राज्यातील वातावरणामध्ये वारंवार बदल होत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेचा जोरदार तडाखा जाणवत आहे तर काही भागात पूर्णतः ढगाळ वातावरण झालेले आहे. तसेच राज्यामध्ये काही भागांमध्ये पाऊस होण्यास सुरुवात झालेली आहे.
महाराष्ट्रातील पुणे मधील चांदणी चौक, कात्रज, कर्वेनगर या भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुण्यातील पावसाने आगमन केले आहे. आज आणि उद्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागानुसार विदर्भाच्या काही भागांमध्ये काल मान्सूनचा आगमन झालं तर पश्चिम विदर्भसह मुंबईतही सकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.
मुंबईमध्ये काही ठिकाणी पाऊस झाला आहे. वांद्रे, अंधेरी, दादर, कुर्ला, वरळी, मुंबई सेंट्रल परिसरात पाऊस झाल्याची माहिती आहे. पुढील 72 तासात मान्सून मुंबईमध्ये अधिक सक्रिय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवार आणि मंगळवार ला मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने सांगितलेला आहे.
पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी चांगली अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे त्यामुळे पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने सांगितलेले आहे. आता जून महिना संपत आला आहे तरी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली नाही त्यामुळे आता नैऋत्य मौसमी पाऊस झाला तर शेतकऱ्यांची चिंता कमी होईल.
महाराष्ट्रात मान्सून लांबल्यामुळे काही शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम संकटात आला आहे मात्र महाराष्ट्रात आता पुढील काही दिवसांमध्ये चांगला पाऊस होईल असा अंदाज सांगण्यात आलेला आहे त्यामुळे ही बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासा करत आहे.
पुढील तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबईमध्ये देखील मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
दररोजचे हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा