Gas Cylinder rate: २०० रुपयांनी स्वस्त होणार गॅस सिलेंडर; तुम्ही कसा घ्याल लाभ, वाचा सविस्तर

Gas cylinder rate: मागील काही दिवसांपासून सर्वसामान्यांना महागाईच्या झळा बसत आहेत. विविध गोष्टींचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले असतानाच सरकारकडून एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे, त्या निर्णय अंतर्गत गॅस सिलेंडरच्या दरामध्ये घट होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिल्यामुळे सरकार कामाला लागले आहे व वाढत्या महागाईमुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो तसेच विविध जाणकार व्यक्तींनी महागाईचा प्रश्न हा निवडणूक मध्ये मोठ्या प्रमाणात उचलला जाऊ शकतो असे मत व्यक्त केले होते हे लक्षात घेऊन सरकारकडून आता पावले उचलायला सुरुवात झाली आहे.

काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला व रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येवर उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना दोनशे रुपयांनी कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येणार असल्याची घोषणा मोदी सरकारतर्फे करण्यात आली.

संपूर्ण देशभरात जवळपास दहा कोटी लोक उज्वला गॅस योजनेचे लाभार्थी आहेत व या सर्व व्यक्तींना या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता आहे परंतु हा निर्णय कधीपासून अमलात येईल या संदर्भात सर्वसामान्य व्यक्तींच्या मनामध्ये संभ्रम आहे.

या तारखेपासून लागू होईल निर्णय | Gas cylinder rate

आता सध्याच्या घडीला उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना दोनशे रुपयांची सबसिडी दिली जाते परंतु आता आणखीन दोनशे रुपयांची सबसिडी मिळाल्याने तब्बल चारशे रुपयांनी स्वस्त गॅस हा उज्वला गॅसच्या लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या निर्णयाची अंमलबजावणी ही एक सप्टेंबर पासून करण्यात येईल.

संपूर्ण महाराष्ट्रातील गॅस सिलेंडरचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा