जर तुम्हाला काम सोडायचे असेल आणि काम सोडण्याचा अर्ज कसा करायचा माहित नसेल तर या लेखांमध्ये तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे आम्ही आजच्या या लेखामध्ये तुम्हाला तीन काम सोडणे विषयीचे अर्ज प्रदान केलेले आहे ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमचा काम सोडण्याचा अर्ज देऊ शकता.
काम सोडण्याचा अर्ज , Resignation Letter Format in Marathi
जेव्हा आपल्याला कोणत्याही कारणास्तव आपले काम सोडायचे असते तेव्हा आपण काम सोडण्याचा अर्ज देत असतो काम सोडण्याचा अर्ज देत असताना संबंधित अर्जाची व्यवस्थित मांडणी करणे गरजेचे ठरते तसेच तो व्यावसायिक भाषेमध्ये असावा लागतो.
काम सोडण्याचा अर्ज देत असताना अर्जामध्ये पुढील बाबी असाव्यात:
1. प्रस्तावना
प्रस्तावनामध्ये आपण कोणत्या कारणांमुळे नोकरी सोडत आहोत याविषयी माहिती द्यावी.
2. मनातील भावना
व्यावसायिक भाषेमध्ये आपल्या भावना आणि अनुभवांचे वर्णन हे प्रस्तावनेनंतरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या परिणाम मध्ये करावे.
3. संधी
शक्य असल्यास संबंधित नोकरी सोडल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींचा लाभ होऊ शकतो व कोणत्या संधी मिळतील याची माहिती संबंधित काम सोडण्याच्या अर्जामध्ये करावी.
4. आभार
अर्ज लिहून झाल्यानंतर शेवटी त्यामध्ये संबंधित मान्यवरांचे आभार मानावे आणि अर्ज स्वीकार करण्याविषयी लिहावे.
काम सोडण्याच्या अर्जाचा नमुना 1
प्रति,
श्री. पाटील आर. एस.
सह्याद्री टेक्नॉलॉजी, पुणे
विषय – काम सोडणे विषयी अर्ज
माननीय मान्यवर,
सस्नेह नमस्कार, माझे नाव सुशांत आहे व मागील एक वर्षापासून मी आपल्या कंपनीमध्ये डिजिटल मार्केटिंग चे काम करत आहे. मी तुम्हाला सुचित करू इच्छितो की माझ्या आरोग्यविषयक समस्यांमुळे मी आपल्या सह्याद्री टेक्नॉलॉजी, पुणे कंपनीमध्ये अधिक काळ काम करू शकणार नाही, त्यामुळे मी डिजिटल मार्केटिंग पदाचा राजीनामा देऊ इच्छितो.
तरी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझा अर्ज स्वीकार करावा.
धन्यवाद,
दिनांक: **/**/***
आपला विश्वासू,
सुशांत
(डिजिटल मार्केटिंग कन्सल्टंट)
काम सोडण्याच्या अर्जाचा फॉरमॅट 2
प्रति,
श्रीयुक्त मॅनेजर साहेब
गोखले इंडस्ट्रीज, नागपूर
विषय :- नोकरीचा राजीनामा देणे विषयी
महोदय,
मी प्रशांत पाटील आपल्या गोखले इंडस्ट्रीज, नागपूर मध्ये मागील दोन वर्षांपासून सुपरवायझर चे काम करत आहे. मला सुपरवायझर पदावर काम करत असताना आनंद होतो परंतु कामाची अनियमित वेळ आणि सुट्ट्यांचा अभाव असल्यामुळे मी आपल्या कंपनीमध्ये काम करू शकणार नाही. त्यामुळे मी माझ्या नोकरीचा राजीनामा देत आहे.
कृपया माझे राजीनामा पत्र स्वीकार करावे.
धन्यवाद,
आपला नम्र,
प्रशांत पाटील
(सुपरवायझर, गोखले इंडस्ट्रीज)
काम सोडणे विषयीचा अर्ज फॉर्मेट 3
प्रति,
श्री. मॅनेजर सर,
विशाल इंडस्ट्री, मुंबई
04 जानेवारी, 2023
विषय: काम सोडण्याचा अर्ज
माननीय मान्यवर,
माझे नाव सुमित कुमार आहे मी मागील तीन वर्षांपासून विशाल इंडस्ट्री येथे ज्युनियर इंजिनिअर पदावरती कार्य करत आहे. मला माझे काम करायला आवडते व यामध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळतात परंतु ज्या प्रकारे काम करून घेतले जाते त्या तुलनेत पगारांमध्ये मागील काही वर्षांपासून वाढ झालेली नाही तसेच माझ्या आईची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे मला त्यांना पैसे पुरवावे लागतात जे या नोकरीच्या पगारात करणे शक्य होत नाही.
त्यामुळे तुम्ही माझा अर्ज स्वीकार करून मला सेवामुक्त करावे. मागील तीन वर्षांपासून आपल्या सोबत काम करून मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या व माझ्यातर्फे तुम्हाला आणि तुमच्या कंपनीला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
आपला विनीत,
सुमित कुमार,
जूनियर इंजिनियर
नोकरी सोडण्याआधी पुढील गोष्टींची काळजी घ्या
1. नोकरी सोडण्यासाठी पुढे भविष्याची थोडीशी प्लॅनिंग करा म्हणजेच नवीन कंपनीमध्ये नोकरी बघून ठेवा किंवा व्यवसाय करणार असाल तर नोकरी सोडण्याआधी त्याविषयी संपूर्ण माहिती घ्या
2. आपण स्वतःच्या हाताने नोकरी सोडण्याचा अर्ज द्यावा व कंपनीमध्ये आणि आपल्या मध्ये काही नाराजी असेल तर ती मिटवण्याचा प्रयत्न करावा
3. नोकरी सोडण्याच्या अर्जात प्रोफेशनल गोष्टी लिहिल्या तर फायदा होतो
4. नोकरी सोडण्याच्या आधी गरज पडल्यास आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करा
सारांश
मला आशा आहे तुम्हाला आजच्या या लेखामध्ये नोकरी सोडण्याचा अर्ज कसा लिहायचा त्याबद्दल माहिती मिळाली असेल जर तुम्हाला हा काम सोडण्याचा अर्ज लेख आवडला असेल तर हा लेख शेअर करा व या लेखात काही कमी असेल तर खाली कमेंट च्या माध्यमातून कळवा तसेच आमचे इतर नाविन्यपूर्ण ब्लॉग पोस्ट देखील वाचा.
1. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय
2. वेबसाईटचे डोमेन नेम म्हणजे काय
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा
काम सोडण्याचा कारण मॅनेजर आणि स्टाफ असेल तर हे अर्ज कसे लिहावे