आपल्याला बऱ्याच वेळा वांगी पिकामध्ये वांग्याची पाने बारीक झालेली बघायला मिळतात व या रोगाचे कारण हे तपकिरी तुडतुडे असतात. म्हणूनच आजच्या या लेखात आपण वांगी पिकावरील तपकिरी तुडतुड्या बद्दल माहिती जाणून घेऊया.
तपकिरी तुडतुड्याचे शास्त्रीय नाव आहे Cestius phycitis. ही एक रस शोषक कीड आहे जी वांग्यासह इतर बऱ्याच ठिकाणी आढळून येते. परिपक्व झालेल्या तपकिरी तुडतुड्यांच्या मानेवर ठळक पिवळ्या रंगाचा पट्टा दिसतो
वांग्यावरील तपकिरी तुडतुड्यांची लक्षणे
1. परिपक्व झालेले तुडतुडे आणि मध्यम अवस्थेतील तुडतुडे वांग्याच्या पानांमध्ये असलेला अन्नरस शोषतात व त्यामध्ये अपायकारक टॉक्सिंस आत सोडतात त्यामुळे वांग्याची पाने बारीक झालेली बघायला मिळतात.
2. वांग्याच्या झाडाची वाढ खुंटते
3. वांग्याची नवीन कोंबे मरतात व फुलांच्या जागी बारीक बारीक वाढलेल्या पानांचे गुच्छ दिसतात
4. झाडावरील वांग्याच्या फळांची संख्या कमी होते व त्यामुळे उत्पादनात बरीच घट होते
5. वांग्याच्या फांद्यांची संख्या गरजेपेक्षा अतिरिक्त वाढते व त्यामुळे झाडाला अतिरिक्त फुलधारणा व फळधारणा होत नाही.
वांगी पिकावरील तपकिरी तुडतुडे यांचे नियंत्रन
• जर आपल्याला सुरुवातीच्या काळात वांगी पिकावर तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळून आला तर आपण अशी नुकसानग्रस्त झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत
• monocrotophos किंवा Imidacloprid या रासायनिक कीटकनाशकांचा दहा दिवसांच्या अंतराने उपयोग करावा व तीन ते चार फवारणी घ्यावीत.
• वांग्याची रोपे मुख्य शेतात लावण्यापूर्वी त्या रोपांना 0.2% Carbosulfan 25 EC ने रोपप्रक्रिया करावी.
आजच्या या लेखात आपण वांगी पिकावरील तपकिरी तुडतुडे बद्दल माहिती जाणून घेतली. जर आपल्याला कोणत्याही इतर पिकाच्या किडीची किंवा इतर माहिती हवी असेल तर कृपया कमेंट करावी व जर हा लेख आवडला असेल तर हा लेख शेअर करा.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा
खरीप मधील सर्व पिकांची अशी माहिती द्या..सोयाबीन,मका,तुर,..आपण खूप चांगली माहिती देतात सर.