डाळिंब पिकावरील ठिपक्यांचे नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय

cercospora leaf spot on pomegranate (डाळिंबाच्या पानांवरील ठिपके) :

नमस्कार शेतकरी बांधवांना आजच्या लेखामध्ये आज आपण जाणून घेऊया पाने आणि फळांवरील सर्कोस्पोरा टिपके या रोगाचे संपूर्ण माहिती जाणून घेऊया. या रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते ते कमी व्हावे यासाठी आपण काय उपाययोजना कराव्या हे आपण जाणून घेऊया

पाने आणि फळांवरील सर्कोस्पोरा टिपके या रोगाचे शास्त्रीय नाव Pseudocercospora punicae आहे.

सर्कोस्पोरा टिपके रोगाची लक्षणे

1) पाने फिकट हिरवी पिवळी होऊन पाने पडतात.

2) गोलाकार,अतिसूक्ष्म अतिसूक्ष्म, आणि तपकिरी ते काळे डाग येतात.

3) फळावरील काळे डाग कालांतराने गडद होतात.

4) पानांवरील डागांना पिवळ्या कडा असतात.

5)फळावर डाग जिवाणूजन्य करपा सारखे दिसतात पण ते गडद काळे डाग दिसतात.

6) संक्रमित काटकी सुकते आणि मरते.

रोगाचा प्रसार

स्युडोसर्कोस्पोरा पुनिसे या बुरशीमुळे रोगाचा प्रसार होतो. हे रोपांच्या अवशेषात आणि संक्रमित रोपांच्या फांदीच्या भागात असतो. पाऊस पडल्यानंतर आणि पाणी साचलेल्या जमिनीच्या रोगाचा प्रसार जलद होतो. पानांवरील डागामुळे प्रकाश संश्लेषण कमी होऊन ऊर्जा निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते.

प्रतिबंधक उपाय

1) जंतू विरहित रोपांची निवड करावी.

2) रोगाला सहनशील वाणाची निवड करावी.

3) उत्पादन कमी होऊ नये म्हणून आपल्या पिकांना योग्य प्रमाणात खते द्यावी.

4) पिकाच्या वाढीच्या अवस्थेत वारंवार शेतात जाऊन रोगांच्या लक्षणाची निरीक्षण करणे.

5) बागेमध्ये स्वच्छता ठेवावी

6) सक्रमित झालेली फळे तोडून ती नष्ट करावे.

7) गळलेली पाने गोळा करून नष्ट करणे.

8) डाळिंबांना पाच अंश तापमानात आणि त्यांना 92%टक्के ह्यूमिडिटी असलेल्या जागी 8 ते 10 आठवडे साठवणे.

डाळिंबावरील टिपके रोगाचे नियंत्रण

Copper Oxychloride 50.0% WP, Mancozeb75.0% WP; Chlorothalonil 75.0% WP; • Kitazin 48.0%EC घटक असणारे बुरशीनाशक दहा ते पंधरा दिवसांनी फवारणी दोन ते तीन वेळा फवारणी करणे.

आपण या लेखातून जाणून घेतले की पाने आणि फळांवरील टिपके यांचे कशाप्रकारे नियोजन करणे. रोगाचा प्रसार कमी प्रमाणात व्हावे यासाठी काही उपाययोजना करावेत आपण जाणून घेतले आहे. जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा जर काही शंका असेल तर कमेंट करा.

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा