टोमॅटोवरील लवकर येणारा करपा: लक्षणे आणि उपाय

टोमॅटो करपा रोग: नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेऊया टोमॅटो पिकावरील लवकर येणारा करपा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

टोमॅटो पिकावरील प्रमुख रोगांपैकी लवकर येणारा करपा हा प्रमुख रोग आहे.या रोगाच्या प्रादुर्भामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात घट होत आहे.या रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते ते कमी व्हावे यासाठी आपण काय उपाययोजना कराव्या हे आपण जाणून घेऊया.

टोमॅटोवरील लवकर येणारा करपा या रोगाचे शास्त्रीय नाव Alternaria solani आहे. या रोगाचा प्रसार बुरशी पासून होतो. या रोगाचे एकात्मिक रोग प्रतिबंधक उपाय कसे करावे हे जाणून घेऊया.

टोमॅटोवरील लवकर येणारा करपाचे लक्षणे

1) पानांवर पिवळ्या प्रभावळीचे काळे ठिपके दिसतात.

2)पाने पिवळी पडतात, नंतर पाने गळतात.

3) डाग हे पानांवर फांद्यावर आणि दिसतात.

4)फळे कुजुतात आणि नंतर गळतात.

टोमॅटोवरील लवकर येणारा करपा प्रतिबंधक उपाय

1) निरोगी रोपांची निवड करावी.

2) रोगाला प्रतिबंधक असणाऱ्या वाणाची निवड करावी.

3) झाडामध्ये अंतर ठेवावे कारण हवा खेळती राहिली पाहिजे.

4) पिकांना योग्य प्रमाणात खते द्यावी

5) शेतामध्ये पाणी साठवून देऊ नये.

6) बागेमध्ये स्वच्छता ठेवावी.

7) पिकाला सकाळी पाणी द्या ठिंबक सिंचन चा वापर करा जेणेकरून संपूर्ण दिवस कोरडी राहील.

8) आपल्या बागांमध्ये दररोज जाऊन रोगाच्या लक्षणाची निरीक्षण करणे .

9) ज्या पानावर रोगाची लक्षणे दिसत असेल तर ते पान काढुन नष्ट करा.

10) जमिनी जवळचे पान काढून टाका.

11)वाऱ्याच्या दिशेने आणि सावली टाळुन वाफे तयार करा.

12)लागवडीसाठी चांगला निचरा होणारी व गादी वाफ्याची प्रद्धत वापरा.

13)झाडे ओली असताना शेतात काम करू नका.

14)काढणीनंतर झाडांचे अवशेष काढुन जाळुन टाका

टोमॅटोवरील लवकर येणारा करपा नियंत्रण

जैविक नियंत्रण

बॅसिलस सबटिलीस किंवा कॉपरवर आधारीत बुरशीनाशके हे स्पर्धक जैविक घटक चांगल्या प्रकारे करपा नियंत्रण करते

रासायनिक नियंत्रण

Tebuconazole 50.0% WG, Trifloxystrobin 25.0% WG,Copper Oxychloride 50.0% WP, Metiram 55.0% वगैरे , Pyraclostrobin 5.0% WG,Mancozeb 75.0% WP घटक असणारे बुरशीनाशक दहा ते पंधरा दिवसांनी फवारणी करावी. दोन ते तीन वेळा फवारणी करणे.

आज आपण या लेखातून जाणून घेतले की टोमॅटोवरील लवकर येणारा करपा यांचे कशाप्रकारे नियोजन करणे, रोगावर नियंत्रण कसे करावे व काय उपाययोजना करावेत हे आपण जाणून घेतले आहे. जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर हा लेख शेअर करा व काही शंका असेल तर कंमेंट नक्की करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा