हरभऱ्याची आयात वाढली, हरभरा रेटवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

Harbhara rate: सध्या महाराष्ट्र राज्य मध्ये हरभऱ्याला चांगला बाजार भाव मिळत आहे मार्केटमध्ये हरभऱ्याला उठाव आहे व परिणामी हरभऱ्याचे आयात देखील वाढले आहे. पुढील काही दिवसांमध्ये हरभरा आयात वाढल्यामुळे हरभरा बाजारभावावर काय परिणाम होतो हे जाणून घेणे गरजेचे ठरते. म्हणूनच आजच्या या बातमीपत्र आपण हरभरा आयातीचा हरभरा बाजार वर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.

सध्या देशांमध्ये तूर, मूग तसेच हरभऱ्याचे भाव तेजीत आहेत. सध्या सणांमध्ये हरभऱ्याचे उठाव वाढल्यामुळे हरभऱ्याला हमीभावापेक्षा जास्त बाजारभाव मिळत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या हरभऱ्याचे बाजार भाव हे 5500 रुपये ते 6300 रुपये दरम्यान आहेत.

हरभरा बाजारभावात आलेली त्याची बघून नाफेड ने देखील आपल्याकडील स्टॉक मार्केटमध्ये उतरवण्यास सुरुवात केली आहे. नाफेडणे मार्केटमध्ये हरभरा उतरवला असला तरीही हरभऱ्याच्या बाजारभावात तेजी कायम आहे व त्यामुळे आयात देखील वाढलेले आहे. यंदा देशामध्ये 5300 टन हरभरा आयात झालेली आहे.

भारतामध्ये सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये हरभरा आयात वाढत असते व हरभऱ्याचे बाजारभाव असेच राहिले तर इतर देशांकडून भारतामध्ये हरभरा निर्यात वाढू शकते. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये देखील हरभऱ्याचे बाजार भाव टिकून राहू शकतात असे मत हरभरा बाजार विशेष तज्ञांनी व्यक्त केले आहे.

अशाच महत्त्वाच्या शेतमाल बाजारांसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

IMD update

3 thoughts on “हरभऱ्याची आयात वाढली, हरभरा रेटवर मोठा परिणाम होण्याची शक्यता”

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा