IMD update: सध्या महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळत आहे. राज्यभरात ठीक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे तर काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन पिकांचे नुकसान झालेले आहे. आज दुपारनंतर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळत आहे.
मागच्या महिन्यात महाराष्ट्रात पावसाने दडी मारली होती व सप्टेंबर मध्ये समाधानकारक पाऊस झाला नव्हता परंतु आता गणपती मध्ये पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाकडून आता नवीन हवामान अंदाज जारी करण्यात आला आहे.
प्राप्त झालेल्या नवीन हवामान अंदाजानुसार उद्या विदर्भामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, नांदेड आणि खानदेशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे आणि अहमदनगर आणि कोकणातील रायगड ठाणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सोमवारी विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड तसेच जालना आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर आणि जळगाव याचबरोबर कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे.
कपाशीवरील पाते गळतीवर रामबाण उपाय
मंगळवारी आणि बुधवारी देखील महाराष्ट्रात ठीक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत असलेल्या पावसाचा पिकांना फायदा होत आहे तर काही ठिकाणी पुरसदृश्य परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान देखील होत आहे.
दररोज चा हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी शेतकरी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
हे पण बघा: शेतकऱ्यांची पीक विम्याची फाईल रखडली, हजार कोटी रुपये दिले तरच पुढे सरकल फाईल
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा