वेबसाईट कशी तयार करायची? How To Create Website in Marathi

जेव्हा आपण इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची माहिती घेत असतो तेव्हा ती माहिती आपण संबंधित वेबसाईटच्या माध्यमातून घेत असतो व ज्ञान प्राप्त करीत असतो. कधीकधी आपल्यालाही प्रश्न पडतो की वेबसाईट कशी तयार करायची? चला तर मग आजच्या या लेखामध्ये जाणून घेऊया की वेबसाईट कशी तयार करावी.

इंटरनेट उपभोक्ता असल्याकारणाने आपण दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट बघत असतो यामधील काही वेबसाईट या माहिती प्रदान करणाऱ्या असतात जसे की pikmahiti.com तर काही वेबसाईटचा उपयोग आपण सामाजिक माध्यमांप्रमाणे करत असतो जसे की फेसबुक, ट्विटर इत्यादी.

आजच्या या लेखामध्ये आपण वर्डप्रेसच्या मदतीने वेबसाईट तयार करणार आहोत जेणेकरून आपण आपले ज्ञान इंटरनेटच्या मदतीने इतर लोकांपर्यंत पोहचवू. आपण वर्डप्रेस चा उपयोग करणार आहोत कारण वर्डप्रेस हे वापरायला सोपे आहे व वर्डप्रेसच्या मदतीने फास्ट वेबसाईट तयार करता येते.

परंतु पुढे जाण्यापूर्वी एकदा आपण वेबसाईट म्हणजे काय हे देखील जाणून घेतले पाहिजे त्यामुळे वेबसाईट म्हणजे काय हे प्रथम जाणून घेऊया.

वेबसाईट म्हणजे काय | What is Website in Marathi

वेबसाईट म्हणजे एक असे स्थान आहे जिथे आपण आपली माहिती प्रकाशित करू शकतो व ती माहिती वर्ल्ड वाईड वेब वरील इतर इंटरनेट वापरकर्त्यांना मिळू शकते. प्रत्येक वेबसाईट चा युनिक ऍड्रेस असतो ज्यामुळे इंटरनेटला वेबसाईट ओळखायला मदत होते.

वेबसाईटच्या ऍड्रेस ला आपण डोमेन नेम असे म्हणू शकतो व संबंधित डोमेन नेम एक व्यक्ती किंवा संघटनेने एकदा खरेदी केल्यानंतर त्याचा मर्यादित कालावधी संपेपर्यंत दुसरे व्यक्ती किंवा संघटना खरेदी करू शकत नाही.

म्हणजेच आता आम्ही pikmahiti.com नावाचे डोमेन नेम खरेदी केलेले आहे त्यामुळे तुम्ही किंवा इंटरनेटवरील इतर वापर करते आमच्या डोमेन नेम चा कालावधी संपेपर्यंत pikmahiti.com डोमेन खरेदी करू शकणार नाहीत.

वेबसाईटच्या डोमेन नेम प्रमाणेच प्रत्येक डोमेन नेमला वेगवेगळ्या प्रकारचे पेजेस जोडलेले असतात त्यांना आपण युआरएल म्हणतो. जर आपण pikmahiti.com चे उदाहरण घेतले तर pikmahiti.com हे डोमेन नेम असते व pikmahiti.com/contact-us ही url असेल.

आता आपण वेबसाईट म्हणजे काय हे जाणून घेतले तसेच आपण वेबसाईटमधील मूलभूत संकल्पना म्हणजेच डोमेन नेम आणि युआरएल विषयी जाणून घेतले. आता आपण वेबसाईट कशी तयार करायची हे चांगल्या प्रकारे समजू शकतो.

वेबसाईट कशी तयार करायची How To Create Website in Marathi

वेबसाईट तयार करण्यासाठी आपल्याला तीन स्टेप चा अवलंब करावा लागेल

1. डोमेन नेम खरेदी करणे

2. वेब होस्टिंग खरेदी करणे

3. डोमेन आणि वेब hosting एकमेकांना जोडणे

4. वर्डप्रेस इंस्टॉल करणे व सुरेख वेबसाईट बनवणे

1. डोमेन नेम खरेदी करणे

वेबसाईट सुरू करण्याची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे डोमेन नेम खरेदी करणे. डोमेन नेम खरेदी करत असताना आपण काही टॉप लेव्हलचे डोमेन नेम खरेदी केले पाहिजे यामध्ये जर मला विचारले तर माझी प्राथमिकता .com, .net, .org तसेच वेबसाईट फक्त भारतात कार्यरत असणार असेल तर .in असल्या डोमेन नेम एक्सटेन्शनला असते.

डोमेन नेम खरेदी करत असताना संबंधित डोमेन नेम हे आपल्या व्यवसायाला अनुरूप असली पाहिजे म्हणजे जर तुमची हिंदी शाळा असेल असेल व त्याचे नाव hindi shala असेल तर तुमच्या व्यवसायाचे नाव तुमच्या डोमेन नेम मध्ये आले तर तुम्हाला गुगल वर फायदा होतो. म्हणजेच आपल्या उदाहरणातील hindi shala या व्यवसायासाठी hindishala.com किंवा इतर टॉप लेव्हल डोमेन एक्सटेन्शन चा उपयोग करून डोमेन नेम घेऊ शकता.

डोमेन नेम खरेदी करत असताना आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जसे की

• डोमेन रजिस्टर करणारी कंपनी कुठली आहे

• संबंधित डोमेन रजिस्टर ची सर्विस कशी आहे

• जर आपल्याला गरज पडली तर कंपनीच्या मार्फत सहकार्य केले जाते का

• डोमेन रजिस्टर करणारी कंपनी फास्ट काम करते की नाही हे पण बघा

मी स्वतः डोमेन खरेदी करत असताना वेगवेगळ्या कंपन्यांच्या मार्फत डोमेन खरेदी केलेले आहे परंतु मला GoDaddy आणि hvoom या दोन कंपन्यांची सर्विस चांगली वाटली. तुम्ही मार्केट रिसर्च करून इतर डोमेन रजिस्टर करून देखील डोमेन नेम खरेदी करू शकता परंतु त्याआधी त्यांचे रिव्ह्यू अवश्य वाचा.

समजा आपण वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून hindishala.com नावाचे डोमेन नेम खरेदी केलेले आहे आता आपण पुढील स्टेप कडे वळूया.

होस्टिंग खरेदी करणे Buy hosting in Marathi

होस्टिंग खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या होस्टिंग कंपनी मार्केटमध्ये उपलब्ध आहे परंतु आपण चांगल्या होस्टिंग कंपनीची निवड केली पाहिजे.

होस्टिंग खरेदी करत असताना देखील काही मुद्द्यांचा विचार करणे खूपच गरजेचे ठरते:

1. आपण जिथून hosting घेतो त्या होस्टिंग चे सर्वर कुठे आहे

2. होस्टिंग कंपनी मार्फत मिळणारा सपोर्ट कसा आहे कारण एकदा आपण डोमेन नेम होस्टिंग ला जोडले तर आपला डोमेन कंपनीशी फारसा संपर्क राहत नाही परंतु होस्टिंग कंपनीची वारंवार संपर्क येत असतो.

3. आपल्या वेबसाईटवर विजिटर किती येणार आहेत म्हणजेच सुरुवातीच्या काही काळामध्ये आपल्या वेबसाईटवर खूपच कमी विजिटर येतात व आपण जर महागडे होस्टिंग खरेदी करून ठेवली तर आपल्या पैशांचे नुकसान होऊ शकते.

4. संबंधित होस्टिंग बरोबर कोण कोणत्या सुविधा मिळत आहेत.

जेव्हा आम्ही वेबसाईट निर्माण केली होती तेव्हा आम्ही hungryhost या होस्टिंग प्लॅटफॉर्मवर आमची वेबसाईट जोडलेली होती. आम्ही hostinger कंपनी बरोबर पण जाऊ शकत होतो परंतु hostinger मधील एक महत्त्वाचा तोटा म्हणजे त्यांचे प्लॅन थोडेसे महागडे होते व त्यांचे सपोर्ट मला इतके चांगले वाटले नाही.

आपण सुरुवातीला वेबसाईट निर्माण करत असताना जास्त पैसे त्यामध्ये लावणे उपयोगी ठरत नाही म्हणूनच आपण सुरुवातीला hungryhost चा एकदम बेसिक प्लॅन खरेदी करूया.

Hungry host चा 59 रुपयांचा प्लॅन येथे क्लिक करून खरेदी करा

3. होस्टिंग आणि डोमेन एकमेकांना जोडणे

आता आपण वरती दिलेल्या उदाहरणाप्रमाणे hindishala.com नावाचे डोमेन नेम खरेदी केले आहे व hungry host चा 59 रुपयांचा प्लॅन खरेदी केलेला आहे. आता समजा आपले डोमेन GoDaddy वरती आहे व होस्टिंग hungry host वर आहे तर आपल्याला होस्टिंग आणि डोमेन एकमेकांना जोडावे लागेल.

डोमेन आणि होस्टिंग एकमेकांना जोडण्यासाठी पुढील स्टेप चा अवलंब करा.

• सर्वात प्रथम तुम्ही जिथून डोमेन नेम खरेदी केलेले असेल त्या वेबसाईट वरती जा व लॉगिन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला nameservers चा विकल्प मिळेल ज्यामध्ये आधीच दोन nameservers टाकलेले असतात ज्यांना तुम्हाला कट करायचे आहे.

• आता आपण जिथून होस्टिंग खरेदी केलेले आहे तिथे या ठिकाणी तुम्हाला दोन nameservers दिले जातील ज्यांना तुम्हाला कॉपी करायचे आहे व domain मधील कट केलेल्या ठिकाणी पेस्ट करायचे आहे.

• साधारण अर्धा ते एक तासांमध्ये तुमचे डोमेन व होस्टिंग एकमेकांना जोडले जाते कधी कधी यासाठी थोडा जास्त वेळ देखील लागू शकतो.

• जर तुम्ही ज्या ठिकाणी डोमेन खरेदी केलेले आहे तिथे nameserver चा विकल्प मिळत नसेल तर तुम्ही पुढे दिलेली व्हिडिओ बघू शकता.

4. Hosting वर वर्डप्रेस इन्स्टॉल करा व सुरेख वेबसाईट बनवा

Hosting वर वर्डप्रेस इंस्टॉल करण्यासाठी आपल्याला प्रथम आपल्या होस्टिंग मध्ये लॉगिन करावे लागेल व त्यानंतर Services च्या विकल्प वरती क्लिक करावे लागेल जिथे आपल्याला आपल्या वेबसाईटचे नाव दिसेल.

संबंधित वेबसाईटच्या थोडे उजव्या बाजूला स्क्रोल करून क्लिक केले की आपल्यापुढे Action चा विकल्प मिळेल ज्यावरती क्लिक करून Login to cpanel या विकल्प वरती क्लिक करायचे आहे.

Cpanel हा ऑटोमॅटिक उघडतो व Cpanel उघडल्यानंतर आपल्याला स्क्रोल करत सगळ्यात खाली जायचे आहे जिथे आपल्याला Script चा विकल्प मिळेल ज्या खाली WordPress असे ऑप्शन मिळेल यावर क्लिक करा. Install Now चा विकल्प मिळेल त्यावर क्लिक करा व संबंधित माहिती व्यवस्थित भरून वर्डप्रेस इंस्टॉल करा. आपले युजरनेम व पासवर्ड नीट लक्षात ठेवा.

5. सुरेख वेबसाईट बनवा

आता वर्डप्रेस इंस्टॉल केल्यानंतर आपल्या वर्डप्रेस च्या डॅशबोर्ड वर जाण्यासाठी आपल्या डोमेन नेम च्या नंतर /wp-admin असे टाईप करा तुमच्या पुढे युजरनेम आणि पासवर्ड टाकण्याचा विकल्प येईल आपण आधीच्या स्टेप मध्ये जो युजरनेम आणि पासवर्ड लक्षात ठेवला होता तो इथे व्यवस्थित भरा व लॉगिन वर क्लिक करा.

आता तुमच्यापुढे वर्डप्रेस डॅशबोर्ड उघडलेला असेल त्यामध्ये तुम्ही Theme च्या विकल्पावर जाऊन नवनवीन डिझाईन असलेल्या Theme लावू शकता सध्या आपल्या वेबसाईट वरती Generatepress नावाची थीम उपयोगात येत आहे.

Theme नंतर आपण काही उपयुक्त plugin इन्स्टॉल करू शकता ज्यामध्ये वेबसाईटचे स्पीड वाढवण्यासाठी cache plugin, वेबसाईट वरील spamming टाळण्यासाठी antispam plugin, तसेच इतर महत्वाच्या plugin चा उपयोग करू शकता. माझ्या वेबसाईट वरील प्लगइन पुढील प्रमाणे आहेत.

Website important plugins

6. वेबसाईटला सर्च कन्सोल जोडा

आता आपण वेबसाईट बनवलेले आहे परंतु ते गुगलला कसे कळणार व गुगल ला ते करण्यासाठी आपण वेबसाईटला सर्च कन्सोल जोडणे गरजेचे ठरते. वर्ल्डप्रेस वेबसाईट वरती अत्यंत सोप्या पद्धतीने सर्च कंसोल जोडण्यासाठी आपण Site Kit नावाच्या प्लगइन चा उपयोग करू शकतो. हे प्लगइन गुगलच्या मार्फत तयार करण्यात आलेले आहे ज्यामुळे ते पूर्णतः सेफ आहे.

सारांश

आजच्या या लेखांमध्ये आपण वेबसाईट कशी तयार करायची याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतलेले आहे जर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारच्या शंका राहिल्या असतील किंवा वेबसाईट निर्माण करताना काही अडचणी येत असतील तर तुम्ही खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा