IMD update: महाराष्ट्र मध्ये जुलै महिन्यामध्ये चांगला पडत असलेला पाऊस अचानक ऑगस्ट महिन्यामध्ये खंड घेतो व आता महाराष्ट्रातील ठिकठिकाणी शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत पावसाविना पिके कोमजले आहेत अशातच हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नवीन हवामान अंदाज समोर येत आहे.
जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्यामध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे नागरिकांना पाणी कपातीचे संकट टाळेल असे वाटत होते परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये पडलेल्या पावसाच्या खंडामुळे नागरिकांना पाणी कपातीचे संकट सोसावत आहेत म्हणूनच आपण आजचा नवीन हवामान अंदाज जाणून घेणे गरजेचे ठरते.
गुजरातच्या दक्षिण भागाकडे सध्या हवेचे चक्रकार परिस्थिती निर्माण होत आहे व यामुळे महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु अरबी समुद्रांमधून निर्माण होणाऱ्या चक्रधर वाऱ्यांमुळे मान्सूनची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी असते असे मत देखील हवामान विभागाने व्यक्त केले.
IMD update: आज राज्यात कसा असेल पाऊस
सध्या महाराष्ट्र मध्ये कोकणपट्ट्यामध्ये व मध्य महाराष्ट्र मध्ये ठीक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत इतर ठिकाणी देखील पाऊस होत आहे परंतु तो पाऊस समाधानकारक नाहीये व आता हवामान विभागांनुसार महाराष्ट्र मध्ये 25 ऑगस्ट नंतर चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे.
हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांच्यानुसार पुढील दहा दिवसांमध्ये महाराष्ट्रात कुठेही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. चांगल्या पावसाच्या सुरुवातीला अजून काही दिवसांचा वेळ लागण्याची शक्यता आहे त्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस चांगल्या पावसाला सुरुवात होऊ शकते असे मत त्यांनी व्यक्त केले.
इतर राज्यांमध्ये कशी आहे परिस्थिती
महाराष्ट्र मध्ये पाऊस पडत नसला तरी इतर काही राज्यांमध्ये पावसाचे विदारक दृश्य समोर आलेले आहे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे पावसाची संततधार सुरू आहे व ठिकठिकाणी पावसामुळे मोठे नुकसान बघायला मिळालेले आहे. हिमाचल मधील शिमला, कुल्लू, कांगडा आणि मंडी या जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
दररोजचा हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा