कांदा खरेदीसाठी केंद्र सरकार प्रतिक्विंटल मोजणार इतके रुपये…

Onion news: सध्या कांद्यावर लावलेल्या 40% निर्यातीच्या शुल्कामुळे देशभरामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे व त्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत 2410 रुपये प्रति क्विंटल या दराने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी सुरू झाल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य मंत्री यांच्यासोबत बैठकी नंतर समाज माध्यमांना दिली.

शासकीय निवासस्थानी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल यांची भेट घेतली त्यानंतर समाज माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की नाशिक, अहमदनगर, लासलगाव इत्यादी केंद्र मधून हा कांदा खरेदी करण्यात येणार असून जर गरज पडली तर दोन लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त कांदा खरेदी केला जाईल.

Onion News: केंद्र सरकार करणार आहे शेतकऱ्यांचा कांदा खरेदी

तसेच कांदा खरेदी ची सुरुवात करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. निर्यात शुल्क लावल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल आणि कांद्याचे बाजार भाव कमी होतील यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कृषी मंत्री मुंडे यांनी पियुष गोयल यांची भेट घेतली होती.

कांदा खरेदी केल्यानंतर संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जाईल तसेच राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली. शेतकऱ्यांनी नाफेड आणि एनसीसीएफ ला कांदा विक्री करावी अशी विनंती धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांनी केली.

केंद्र सरकारच्या वतीने खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम कमी करण्याचे काम केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिपादन केले.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा व मोफत व्हाट्सअप अपडेट मिळवा.

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा