IMD rain alert: धोका वाढलाय, तुफान गारपीटीला सुरुवात, या जिल्ह्यांत अधिक धोका

IMD rain alert: महाराष्ट्र मध्ये हवामान विभागाकडून 11 ते 13 तारखेचा दरम्यान पाऊस पडण्याचा विचारात देण्यात आला होता आणि त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळत आहे महाराष्ट्र मध्ये विदर्भ मध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि वर्धा मध्ये गारपीट झालेली बघायला मिळालेली आहे.

हवामान विभाग बरोबर पंजाब डख यांनी देखील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र मध्ये 11 ते 14 तारखेच्या दरम्यान पाऊस पडण्याचा इशारा दिलेला होता आणि त्यांनी मुख्यतः पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाऊस पडेल असा अंदाज सांगितलेला होता. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्र मध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि गारपीट होत आहे.

IMD Rain Alert: गारपिटीचा इशारा, या जिल्ह्यांना धोका

महाराष्ट्र मध्ये विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे वर्धा मध्ये गारपीट झाल्याची नोंद झालेली आहे आणि लवकरच हा पाऊस इतर भागांमध्ये देखील बसेल असा हवामान अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. पूर्व विदर्भामध्ये सुरू झालेला पाऊस नंतर पश्चिम विदर्भात कडे सरकेल.

अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, हिंगोली या भागांमध्ये लवकरच पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. जळगाव आणि परभणीच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्यास सुरुवात होईल तसेच मराठवाड्यातील संभाजीनगर येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो मराठवाड्यामध्ये ढगाळ परिस्थिती बघायला मिळेल.

पश्चिम महाराष्ट्र मध्ये सध्या पाऊस करण्याची शक्यता काही कमी आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे परंतु या अवकाळी अनिमित्त पावसामुळे विदर्भ मधील पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते कारण गारपिटीचा पाऊस हा नेमका पिक काढणीच्या वेळेस आलेला आहे आता विविध पिकांची पिक काढणे चालू आहे आणि अशातच हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी नुकसान होणार आहे.

महाराष्ट्र बरोबरच मध्यप्रदेश मध्ये देखील नोंद झालेली आहे मध्य प्रदेशच्या दिंडोरी जिल्ह्यामध्ये हिमवृष्टी झाल्याप्रमाणे गारांचा थर साचलेला आहे ज्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वर्धा येथे देखील गारपीट झालेले आहे आणि जर हा पाऊस इतर भागांकडे पसरला तर आपल्या पिकांचे नुकसान होऊ शकते अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

हवामान विभाग तसेच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांच्यामार्फत वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज प्रसारित केला जातो ज्यामुळे पिकांचे नुकसान काही प्रमाणात नियंत्रित केले जाऊ शकते जर तुम्हाला व्हाट्सअप च्या माध्यमातून मोफत हवामान अंदाज तसेच इतर उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा