IMD rain forecast: पुढील चार दिवस धोक्याचे, भयानक गारपिटीचा इशारा

IMD rain forecast: महाराष्ट्र मध्ये पुढील चार दिवस जोरदार गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यता विदर्भ भागांमध्ये हा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा प्रभाव तमिळनाडू किनारपट्टी वरती पडलेला आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र मध्ये देखील पुढील चार दिवस पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्र मध्ये सर्वदूर हा पाऊस पडणार नसला तरी ज्या भागांमध्ये पडेल तेथे पिकांचे मोठे नुकसान होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे कारण सध्या पिकांची कापणी सुरू आहे. गहू काढणे चालू आहे तसेच हरभरा, कांदे काढणे आणि इतर पिकांची काढणी चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरवण्याची शक्यता आहे.

IMD rain forecast – पुढील चार दिवस गारपीट हवामान अंदाज

महाराष्ट्रातील ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्र मध्ये 11 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी 13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या काहीशा भागांमध्ये पाऊस पडण्याचा हवामान अंदाज देण्यात आलेला आहे हा पाऊस मुख्यता पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे असेल.

विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर या भागांमध्ये गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच काही भागांमध्ये गारपीट होण्यास सुरुवात देखील झालेली आहे पुढील 24 तासांमध्ये हा पाऊस विदर्भामध्ये इतर भागांमध्ये पसरण्यास सुरुवात होईल आणि विदर्भामधील अकोला, अमरावती, बुलढाणा या भागांमध्ये हा पाऊस पसरेल. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल आणि तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे

पंजाबराव यांच्यानंतर आता IMD Pune यांच्यामार्फत पुढील तीन-चार दिवस विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हा पाऊस मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पडेल तसेच नागपूर आणि वर्धा या ठिकाणी वादळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र मध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे आणि त्याचाच परिणाम विदर्भ आणि मराठवाडा वरती पडणार आहे महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे.

संपूर्ण देशभरामध्ये दहा तारखेपासून उन्हाचा पारा वाढलेला बघायला मिळेल आणि याचा देखील पिकांवरती परिणाम होणार आहे. सकाळी मिळालेल्या हवामान वृत्तानुसार देवळी जिल्हा वर्धा येथे गारपीट झालेली आहे. विविध ठिकाणी विदर्भामध्ये पावसाचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे आणि पुढील काही तासांमध्ये पाऊस इतर भागांमध्ये पसरलेला बघायला मिळेल महाराष्ट्र बरोबरच छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये देखील पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा