Lek Ladki Yojana Form: लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारची मुलींसाठी बनवलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे त्यामध्ये मुलींना वयाच्या 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच मुलींचा जन्म झाल्यापासून मुलींसाठी चा निधी वितरित केला जाईल.
परंतु आपल्या मनात प्रश्न पडू शकतो की या लेक लाडकी योजनेमध्ये आपण नाव कसे नोंदवायचे किंवा यासाठी फॉर्म कसा भरायचा तर या संदर्भातील माहिती आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत यामध्ये आपण लेक लाडकी योजनेचा फॉर्म डाऊनलोड करून कुठे अप्लाय करायचा याविषयीची माहिती जाणून घेऊ तसेच या लेखांमध्ये लेक लाडकी योजनेचा पीडीएफ फॉर्म देखील दिलेला आहे.
Lek Ladki Yojana Form Online Apply
लेक लाडकी योजनेमध्ये मुलींना वयाचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये रक्कम रोख दिली जाईल तसेच मुलीचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये, इयत्ता पहिली मध्ये 5000 आणि इयत्ता सहावी मध्ये सात हजार रुपयांचा निधी दिला जाईल याचबरोबर जेव्हा मुलगी अकरावीला जाईल तेव्हा पुढील शिक्षणासाठी तिला आठ हजार रुपयांचा निधी दिला जाईल.
महाराष्ट्र मधील मुलींचा जन्म तर वाढवणे आणि त्यांचे शैक्षणिक क्षेत्रामधील योगदान वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून लेक लाडकी योजनेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे आणि यासाठी एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुली आवेदन पाठवू शकतात.
लेक लाडकी योजनेची पात्रता
ज्या कुटुंबीयांकडे पिवळे किंवा केसरी शिधापत्रक असेल असे कुटुंब लेक लाडकी योजनेसाठी आवेदन पाठवू शकतात यासाठी मुलीचा जन्म एक एप्रिल 2023 नंतर झालेला असावा तसेच दुसऱ्या अपत्याच्या वेळेस योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असलेले प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा तसेच संबंधित लाभार्थ्याचे बँक खाते असावे ज्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असेल असे कुटुंबच फक्त या योजनेचा लाभ घेऊ शकतील. बालविवाहाचे प्रमाण कमी करून मुलींचा मृत्यू दर कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे करायचा
जेव्हा एक एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्म झालेल्या मुलीला संबंधित लेख लाडकी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तेव्हा आम्ही खाली दिलेला फॉर्म डाऊनलोड करा आणि तो फॉर्म आवश्यक दस्तावेजंसह अंगणवाडी सेविकेकडे प्रदान करावा परंतु संबंधित फॉर्म देण्यापूर्वी मुलीच्या जन्माची नोंद ग्रामीण किंवा नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये करावी.
अंगणवाडी सेविकांनी संबंधित मुलींचा फॉर्म भरण्यासाठी मदत करावी आणि फॉर्म भरल्यानंतर कागदपत्रांसह तो मुख्य अंगणवाडी पर्यवेक्षकाकडे किंवा मुख्यसेविका कडे जमा करावा. मुख्य सेविका संबंधित अर्जांची छाननी करेल आणि ते अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सादर करणे तदनंतर संबंधित लाभार्थ्यांचे अर्ज मंजुरी झाल्यानंतर लाभार्थ्यांना विहित राशी प्रदान केली जाईल.
लेक लाडकी योजनेचा फॉर्म
जर तुम्हाला लेक लाडकी योजनेचा फॉर्म डाऊनलोड करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या पीडीएफ फॉर्म मधून तो डाउनलोड करू शकता:
लेक लाडकी योजनेचा फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर त्याबरोबर कोणते डॉक्युमेंट जोडायचे तसेच इतर महत्त्वाच्या माहितीसाठी : लेक लाडकी योजना येथे क्लिक करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा