मका पिकातील खोड पोखरणाऱ्या अळीचे लक्षणे आणि व्यवस्थापन

मका खोड पोखरणारी अळी: मक्का मधील एक प्रमुख अळी म्हणून खोड पोखरणाऱ्या अळी ला ओळखले जाते. या अळीचे वास्तव्य भारत, पाकिस्तान, जपान, इंडोनेशिया, थायलंड, सुदान, इराण, बांगलादेश, नेपाळ या भागांमध्ये आहे.

मका बरोबरच खोड पोखरणाऱ्या अळीचा ज्वारी, ऊस, बाजरी आणि तांदूळ या पिकांवर प्रादुर्भाव आढळतो. खोड पोखरणाऱ्या अळी मुळे मकाचा मुख्य शेंडा वाळतो त्यालाच dead heart म्हणून ओळखले जाते.

खोड पोखरणाऱ्या अळीची लक्षने

• पानाच्या कोंबा शेजारी या अळीने तयार केलेली होल दिसून येतात
• सुरुवातीच्या काळात ही अळी कोवळ्या पानांना खाऊन जगते
• झाडाचा मध्यभागचा मुख्य शेंडा वाळतो त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व झाड मरते

खोड पोखरणाऱ्या अळी विषयी माहिती

खोड पोखरणाऱ्या अळीचा पतंग हा मध्यम आकाराचा असतो व स्ट्रॉं च्या रंगाचा असतो. प्रत्येक मादा पतंग एका वेळेस 25 अंडी घालू शकतात. ही अंडी पानाच्या मुख्य शिरेशेजारी खालच्या बाजूला एकत्रित स्वरूपात आढळतात. दोन ते पाच दिवसात अंडी उबून त्यातून पिवळसर राखाडी रंगाच्या व राखाडी डोक्याच्या अळी बाहेर पडतात. अळी चे जीवनमान कालावधी 28 ते 50 दिवस असते.

खोड पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

• खोड पोखरणाऱ्या अळीला प्रतिबंधक वरायटीचा उपयोग करावा जसे की गंगा 4,5,7, हिम 129, डेक्कन 101, गंगा सफेद 2, कुंदन, कांचन, हिम 123

• मुख्य मका पिकावर खोड पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चवळी किंवा वालाचे अंतर्गत पीक लावावे

• मक्का पिकाची काढणी झाल्यानंतर शेतीत राहणारी खोडे जमिनीत खोलवर गाडावी किंवा बाहेर काढून नष्ट करावेत.

• रात्रीच्या वेळेस प्रकाश सापळ्यांचा उपयोग करावा व त्यात अडकलेल्या पतंगांना नष्ट करावे

• अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास dimethoate ची फवारणी घ्यावी.

• जैविक पद्धतीने नियंत्रणासाठी आपण ट्रायकोग्रामा चीलोनिस चा उपयोग करू शकता.

• जर आपल्याकडे गॅस निर्माण करणारे दाणेदार कीटकनाशक असेल तर आपण त्यामध्ये वाळू मिश्रित करून मकाच्या कोंबा मध्ये टाकू शकता.

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा