मका वरील गुलाबी खोड अळी ची लक्षणे व उपाय

मका वरील गुलाबी खोड अळी: मका वरील गुलाबी खोड अळीचे शास्त्रीय नाव Sesamia inferens आहे.

ही अळी कुठे कुठे आढळते : मका वरील गुलाबी अळी ही भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया, भूतान, मलेशिया, चीन, बांगलादेश, कोरिया, जपान, तैवान देशांमध्ये आढळते.

गुलाबी अळीचे भक्ष: मका, ऊस, ज्वारी, गहू, तांदूळ, बाजरी

नुकसानीचा प्रकार: गुलाबी रंगाची अळी फांदीमध्ये होल करून आत मध्ये जाते व त्यामुळे मकाचा मुख्य शेंडा जळतो, झाडाची वाढ खुंटते व झाड मरते. या अळीची लक्षणे मकाच्या खोड अळी प्रमाणे असतात.

गुलाबी खोड अळी विषयी माहिती

गुलाबी खोड अळीचे पतंग स्ट्रॉ रंगाचे असतात व त्यांची सफेद रंगाची पंख असतात. अळी ही गुलाबी राखाडी रंगाची असते जीचे डार्क कलर चे डोके असते. ही अळी पानांवर लांब निमुळते होल पाडते.

गुलाबी अळीचे भौतिक नियंत्रण

1. प्रकाश सापळ्यांचा वापर करावा
2. शेत स्वच्छ ठेवावे
3. पूर्ण वाढलेली मकाची रोपे उपटून नष्ट करावे
4. डेक्कन 101 व डेक्कन 103 या प्रतिबंधात्मक व्हरायटीचा उपयोग करावा.

मका वरील गुलाबी अळीचे जैविक व्यवस्थापन

आठ कार्ड प्रति हेक्टर या प्रमाणात ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवी अंडी खाणाऱ्या सूक्ष्म जीवांचा उपयोग करावा.

मका वरील गुलाबी अळी चे रासायनिक व्यवस्थापन

मका वरील गुलाबी अळीचे रासायनिक व्यवस्थापन करताना आपण इमामेक्टिन बेंजोएट या रसायनाचा उपयोग करू शकता.

मका खोड अळी विषयी माहिती

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा