Rain forecast: आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये पावसासाठी तयार होत असलेली पोषक परिस्थिती आणि दक्षिण दिशेकडे सरकलेला मान्सूनचा आस हा पावसासाठी उपयुक्त ठरत आहे व त्याचा एकंदरीत परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होऊन पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
सध्या मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा हा जमशेदपूर, सिधी, बिकानेर, आणि शिवपुरी या भागांमध्ये सक्रिय आहे. वाऱ्याची परिस्थिती बघितली तर हवेचे चक्रकार वारे हे समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवरून वाहत आहेत व झारखंड, मध्य प्रदेश, आग्नेय उत्तर प्रदेश आणि आग्नेय राजस्थान या भागांमध्ये अजून एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे.
Rain forecast – पावसाचा इशारा
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये पावसासाठी पोषक काळे ढग बघायला मिळत आहेत व आज विदर्भामधील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच उर्वरित विदर्भ, कोकणालगतचा घाटमाथ्याचा परिसर, कोकण, मराठवाडा आणि खानदेश या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिसाच्या किनाऱ्यालगतच्या भागांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय होताना बघायला मिळत आहे व हे कमी दाबाचे क्षेत्र उद्यापर्यंत छत्तीसगड आणि ओडिशाकडे सरकण्याची चिन्हे आहेत.
दररोज चा हवामान अंदाज मिळवण्यासाठी शेतकरी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
7 thoughts on “Rain forecast: पुढील 24 तासात महाराष्ट्रात या जिल्ह्यात पावसाचा कमबॅक”