Sugar rate update: जवळ येत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार सध्या विविध शेतमालाचे भाव नियंत्रणात ठेवण्याच्या प्रयत्न करत आहे व त्यामुळे आता कांदा, टोमॅटो तसेच गहू, तांदळाचे बाजार भाव कमी झाल्याचे बघायला मिळत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये सरकारकडून साखरेचे भाव नियंत्रणात राहावे यासाठी सरकार ने पावले उचलायला सुरुवात करण्यात आलेली आहे.
साखरेच्या बाजारभावाचा विचार केला तर मागील महिन्यापासून आतापर्यंत फक्त एक टक्क्यांनी साखरेचे बाजारभाव वाढले आहे परंतु तरीही सरकारकडून बाजारभाव नियंत्रणासाठी पावले उचलायला सुरुवात करण्यात आली आहे. ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्यामध्ये साखरेची मागणी वाढण्याची शक्यता आहे व त्यामुळे आत्ताच केंद्र सरकारने साखर कारखान्यांना साखरेचा कोटा जाहीर करून साखर विक्रीचे आदेश काढले आहेत.
सरकारकडून साखर कारखान्यांना 13 लाख टन साखर विक्रीचा कोटा हा ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहीर केलेला आहे व साखर कारखान्यांना ही साखर विक्रीचे आदेश आहे त्यामुळे सणासुदीच्या कालावधीमध्ये साखरेचे बाजारभाव पडण्याची शक्यता आहे. संबंधित साखर ही लवकरात लवकर विकली जावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
हे पण वाचा: कपाशीवरील पातेगळतीवर उपाय
सध्या खाऊक बाजारामध्ये साखरेला 4054 रुपये दर आहे तर किरकोळ बाजार मध्ये साखरेला 44 रुपये दर आहे मागील वर्षाच्या तुलनेत हा दर जास्त वाढलेला नाही परंतु तरीही अशा परिस्थितीमध्ये सरकारने साखर कारखान्यांना व्यापाऱ्यांना तसेच साखरेचे स्टॉक करणाऱ्यांना आपल्याकडील साखरेची माहिती सरकारच्या पोर्टलवर नोंदवण्याचे सूचना केलेली आहे.
अशाच दररोजच्या नावीन्यपूर्ण माहितीसाठी शेतकरी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
हे पण वाचा:
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा