Havaman andaj: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र मध्ये पावसाळा सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी चांगला जोरदार पाऊस पडत आहे परंतु आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचे वेध लागलेले आहेत महाराष्ट्रात परतीचा पाऊस कधीपासून सुरू होईल याविषयी शेतकऱ्यांना जिज्ञासा जागृत झाली आहे.
महाराष्ट्र मध्ये ३० सप्टेंबर पासून अधिकृतरित्या मान्सून चा हंगाम संपेल असे प्रतिपादन हवामान विभागांनी दिलेले आहे तसेच २५ सप्टेंबर पासून महाराष्ट्र मध्ये पाऊस परतीच्या प्रवासाला लागेल असे मत हवामान विभागाने सांगितले आहे. पश्चिम राजस्थानच्या काही भागांमधून 25 सप्टेंबर नंतर मान्सून माघारी फिरायला सुरुवात होईल. व त्यानंतर परतीच्या पावसाला सुरुवात होईल.
मान्सून परतीचा प्रवासाला लागणार असला तरी ज्येष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांच्यानुसार महाराष्ट्र मध्ये परतीच्या पावसाचा प्रभाव कमी राहील व महाराष्ट्राला परतीच्या पावसाचा जास्त लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्या मतानुसार दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सून परतीच्या प्रवासाला लागतो परंतु आता फक्त दहा दिवस पावसाळा संपायला राहिलेले असताना परतीच्या पावसाची सुरुवात होणार आहे.
सध्या परतीच्या पावसासाठी आवश्यक असलेले हवामानाचे क्षेत्र निर्माण झालेले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा परतीचा पाऊस कमी पडू शकतो असे मत रामचंद्र साबळे यांनी सांगितले. दरवर्षी जेवढा परतीचा पाऊस येतो तेवढा यावर्षी येण्याची शक्यता नाही त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांवर संकट येण्याची शक्यता आहे.
दररोजच्या हवामान अंदाज साठी शेतकरी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा