आपण कधीतरी डोमेन हे नाव ऐकलेले असते परंतु तुम्हाला माहित आहे का डोमेन नेम म्हणजे काय असते व प्रत्येक वेबसाईट मध्ये याचे काय महत्त्व असते. जेव्हा आपण सुरुवातीच्या काळामध्ये इंटरनेट विषयी माहिती प्राप्त करण्यास सुरुवात करतो तेव्हा आपल्यापुढे एक नवीन संज्ञा येथे ज्याला आपण डोमेन नेम असे म्हणतो.
जे व्यक्ती आधीपासून वेबसाईट किंवा वेबसाईट डिझाईन या क्षेत्रामध्ये कार्यरत नसतात त्यांना ही संज्ञा नवीन वाटू शकते म्हणूनच आपल्याला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे आजच्या या लेखामध्ये आपण डोमेन नेम म्हणजे काय याविषयी माहिती जाणून घेऊया.
डोमेन नेम म्हणजे काय What is Domain name in Marathi
डोमेन नेम हे वेबसाईटचे नाव असते किंवा ज्याला आपण वेब ऍड्रेस असे देखील म्हणू शकतो, ज्याच्या मदतीने इंटरनेटवरील आपली वेबसाईट ओळखता येते. प्रत्येक वेबसाईटचे डोमेन नेम हे वेगवेगळे असते.
ज्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे नाव असते त्याचप्रमाणे प्रत्येक वेबसाईटचे देखील वेगवेगळे नाव असते व इंटरनेटवरील कोणत्याही दोन वेबसाईटचे एकच नाव असू शकत नाही म्हणजेच इंटरनेटवरील कोणत्याही दोन वेबसाईटचे एकसारखे डोमेन नेम असू शकत नाही.
आता आपल्या वेबसाईटचे नाव हे pikmahiti.com आहे ज्याला आपण डोमेन नेम असे देखील म्हणू शकतो म्हणजेच कोणत्याही व्यक्तीला जर आपल्या वेबसाईट वरती यायचे असेल तर जर त्यांनी ब्राउझर वर टाईप केले तर तो आपल्या वेबसाईट वरती येऊ शकतो.
डोमेन नेम चा काय उपयोग आहे
कोणत्याही वेबसाईटचा वेब ऍड्रेस जसा इंटरनेट वरती आपल्याला दिसतो तो प्रत्यक्षात तसा नसतो म्हणजेच जर आपल्याला युट्युब वरती जायचे असेल तर आपण ब्राउझर मध्ये youtube.com टाईप करतो.
परंतु इंटरनेट वरती प्रत्येक वेबसाईट ही बॅकएंडला आयपी ऍड्रेस च्या माध्यमातून कार्य करत असते जे 128.241.41.23 अशा प्रकारचे असते परंतु प्रत्येक वेबसाईट मधील हा नंबर आपल्या लक्षात ठेवणे शक्य नाही. अशा वेळेस वेबसाईट च्या ऍड्रेस ला नंबरच्या स्वरूपातून बदलून टेक्स्ट च्या स्वरूपात करणे आवश्यक असते.
म्हणूनच इंटरनेट आणि वेब ऍड्रेस ला सोपे बनवण्यासाठी डोमेन यांची गरज पडत असते .डोमेन नेम हे एक सरळ आणि साधा उपाय आहे ज्याद्वारे कोणताही व्यक्ती डोमेन नेम लक्षात ठेवू शकतो व जर एखाद्या वेबसाईट वरती जायचे असेल तर डोमेन नेमच्या साह्याने जाऊ शकतो. जे आयपी ॲड्रेस च्या मदतीने करणे अवघड आहे.
डोमेन नेम कुठून खरेदी करायचे
डोमेन नेम खरेदी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या वेबसाईटचा उपयोग करू शकतो वेगवेगळ्या ब्लॉग आणि वेबसाईट या डोमेन रजिस्टर करणाऱ्या कंपनीच्या प्रमाणे कार्य करत असतात परंतु आपल्याला मार्केटमध्ये चांगले डोमेन कंपनी निवडणे गरजेचे असते. डोमेन नेम खरेदी करण्यासाठी मी मुख्यता तीन कंपन्यांचा उपयोग करतो ज्या आहेत
1. GoDaddy
2. Namecheap
3. Hvoom
वरील वेबसाईट पैकी GoDaddy आणि Namecheap या दोन वेबसाईट प्रचलित आहे परंतु मी तिसऱ्या वेबसाईटचा उल्लेख यासाठी केलेला आहे की संबंधित वेबसाईट मध्ये स्वस्तामध्ये आपल्याला डोमेन नेम मिळू शकते.
डोमेन हे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या रेट मध्ये मिळू शकतो परंतु आपल्याला कोणताही डोमेन नेम खरेदी करत असताना त्यांची सर्विस, कंपनीची ऑथॉरिटी आणि कंपनी प्रचलित आहे की नाही हे बघणे गरजेचे ठरते.
डोमेन नेम खरेदी करत असताना काय काळजी घ्यावी
1. डोमेन नेम खरेदी करत असताना शक्यतो टॉप लेव्हलचे डोमेन नेम खरेदी करावे जसे की .com, .net, .org, .info, .top, .pro, इत्यादी
2. आपण जे डोमेन नेम खरेदी करत आहोत त्यामध्ये आपल्या व्यवसायाची छबी दिसली पाहिजे म्हणजेच जर आपले ब्रँड कॉफी कॅफे नावाचे कॉफी शॉप असेल तर आपण घेतलेल्या डोमेन नेम मध्ये ब्रँड कॉफी कॅफे हे नाव आले तर फायदा होतो
3. डोमेन नेम खरेदी करत असताना संबंधित कंपनीचे व्यवस्थित माहिती घेणे गरजेचे ठरते व कंपनीचे रिव्ह्यू वाचल्यास फायदा होतो
4. जर डोमेन नेम हे छोटे आणि वाचण्यासाठी सोप्पे असेल तर आपल्याला निश्चितच फायदा होतो
5. जर आपल्याला फक्त लोकल पातळीवर काम करायचे असेल तर आपण संबंधित कंपनीचे डोमेन नेम एक्सटेंशन घेऊ शकतो म्हणजे जर आपला व्यवसाय फक्त भारतातच कार्यरत असेल तर आपण .in किंवा .co.in प्रकारचे तुम्ही घेऊ शकतो.
सारांश
आजच्या लेखामध्ये आपण डोमेन नेम म्हणजे काय तसेच डोमेन नेम खरेदी करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे व इतर काही महत्त्वाची माहिती जाणून घेतली. मला आशा आहे या लेखाद्वारे तुमचे डोमेन नेम विषयीचे प्रश्न मिटलेले असतील.
तुमच्या मनात डोमेन नेम विषय कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये कळवा.
आता तुम्ही डोमेन नेम विषयी माहिती जाणून घेतली आहे आता पुढील पायरी म्हणजे वेबसाईट कशी बनवावी हे जाणून घेणे.
हे पण वाचा :
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा