जर तुम्हाला वेबसाईट आणि इंटरनेटची आवड असेल तर तुम्ही होस्टिंग म्हणजे काय हे नक्कीच ऐकलेले असेल त्यामुळेच आजच्या लेखांमध्ये आपण होस्टिंग चे प्रकार आणि होस्टिंग चे कोणते कार्य आहेत तसेच होस्टिंग खरेदी करताना कोणत्या प्रकारची होस्टिंग खरेदी करावी व इतर महत्त्वाची माहिती जाणून घेऊया
जर तुम्हाला वरती दिलेली गोष्टींची माहिती माहिती नसेल तर हा लेख तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण गोष्टी खरेदी करत असताना आपल्याला पैसे देऊन होस्टिंग खरेदी करावे लागते व जर आपण चांगली होस्टिंग खरेदी केली नाही तर आपल्याला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
जर या लेखांमधील दिलेल्या सर्व माहितीचा अवलंब केला तर तुम्हाला होस्टिंग खरेदी करत असताना चांगले ज्ञान प्राप्त होईल व तुम्ही चांगली होस्टिंग खरेदी करू शकाल चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण होस्टिंग म्हणजे काय हे जाणून घेऊया.
वेब होस्टिंग म्हणजे काय | What is Hosting in Marathi
कोणत्याही वेबसाईटला इंटरनेट वरती कार्य करण्यासाठी होस्टिंग ची आवश्यकता असते. ज्या प्रकारे आपल्या कॉम्प्युटरमध्ये हार्ड डिस्क आणि मोबाईल मधील मेमरी मध्ये वेगवेगळ्या प्रकारची फोटो, व्हिडिओ इत्यादी सेव राहतात त्याचप्रमाणे आपल्या वेबसाईट वरील वेगवेगळे प्रकारचे कंटेंट जसे की इमेज, टेक्स्ट व्हिडिओ आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी स्टोअर करण्यासाठी वेबसाईटला होस्टिंग असणे गरजेचे ठरते.
जेव्हा आपण इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची वेबसाईट उघडतो तेव्हा ती वेबसाईट होस्टिंगला जोडलेली असते. जेव्हा आपण वेबसाईटचे डोमेन नेम इंटरनेट ब्राउझर मध्ये टाकतो व वेबसाईट उघडतो तेव्हा आपण होस्टिंग मध्ये साठवलेल्या कंटेंट ला बघत बसतो.
डोमेन आणि होस्टिंग समजण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया.
जेव्हा आपल्याला कुणाच्याही घरी जायचे असते तेव्हा आपल्याला संबंधित व्यक्तीचा पत्ता माहीत असणे गरजेचे ठरते व इंटरनेटवर डोमेन नेम असे म्हणतात व आपण संबंधित व्यक्तीच्या घरी जातो तर ते घर म्हणजे इंटरनेटच्या भाषेत होस्टिंग असे म्हणू शकतो.
वेब होस्टिंग ची व्याख्या
होस्टिंग हे एक इंटरनेटवरील माध्यम आहे ज्याच्यामार्फत वेबसाईटचा कंटेंट जसे की चित्र अक्षरे व्हिडिओ आणि ऑडिओ इत्यादी इंटरनेट बरोबर जोडण्यासाठी मदत होते. होस्टिंग हे एक सर्वर असते जे २४ तास चालू असते.
वेब होस्टिंग चे प्रकार Types of hosting in Marathi
वेब होस्टिंग मुख्यता सहा प्रकारचे असते जे पुढील प्रमाणे आहेत
- Shared होस्टिंग
- वर्डप्रेस होस्टिंग
- डेडिकेटेड होस्टिंग
- वर्चुअल प्रायव्हेट सर्वर
- क्लाऊड होस्टिंग
- रिसेलर होस्टिंग
वेब होस्टिंगचा प्रकार | माहिती |
Shared होस्टिंग | या प्रकारच्या गोष्टींमध्ये एकाच वेब सर्वर वेगवेगळे युजर जोडलेले असतात. या Shared होस्टिंग ची किंमत सामान्यता कमी असते |
वर्डप्रेस होस्टिंग | वर्डप्रेस होस्टिंग हे वर्डप्रेस कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम चालवण्यासाठी एक सर्वोत्तम उपाय असतो |
डेडिकेटेड होस्टिंग | या होस्टिंग मध्ये एका यूजर ला एक स्वतंत्र सर्वर दिले जाते ज्यामुळे संबंधित होस्टिंग मध्ये जास्त bandwidth व अधिक उच्च संसाधन मिळतात. ही होस्टिंग शेअर्ड होस्टिंग पेक्षा महागडी असते. |
वर्चुअल प्रायव्हेट सर्वर | ज्या गोष्टींचा उपयोग अशा वेबसाईट वरती होतो ज्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये विजिटर येत असतात. |
क्लाऊड होस्टिंग | क्लाऊड होस्टिंग चा उपयोग क्लाऊड संसाधनांचा उपयोग करण्यासाठी होतो ज्यामध्ये एप्लीकेशन आणि वेबसाईट यांचा ॲक्सेस मिळवणे सोपे जाते |
रिसेलर होस्टिंग | जर आपल्याला स्वतःची होस्टिंग कंपनी स्वस्त मध्ये सुरू करायची असेल तर आपल्याला या प्रकारची होस्टिंग मदत करत असते. |
वेब होस्टिंग कसे काम करते
जेव्हा इंटरनेट वापर करता कोणत्याही वेबसाईटला भेट देत असतो तेव्हा संबंधित युजर ची रिक्वेस्ट वेब होस्टिंग म्हणजे सर्वर कडे पाठवले जाते व सर्वर कडून त्या रिक्वेस्ट ला प्रतिसाद म्हणून संबंधित उपयुक्त माहिती युजरच्या ब्राउझर कडे पाठवले जाते.
संबंधित प्रक्रिया अत्यंत जलद गतीने होते त्यामुळे ही प्रक्रिया समजून येत नाही. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर युजर इंटरनेटचा वापर करून वेबसाईटला भेट देतो वेबसाईटला भेट दिली तर संबंधित यु आर एल ची रिक्वेस्ट वेब होस्टिंग कडे पाठवली जाते व वेब होस्टिंग मध्ये संबंधित यु आर एल साठी साठवलेले माहिती युजरच्या ब्राउझर मध्ये पाठवले जाते.
वेब होस्टिंग चा फायदा
- कोणत्याही वेबसाईटला इंटरनेटवर कार्यरत राहण्यासाठी वेब गोष्टींचा फायदा होतो
- चांगली होस्टिंग seo मध्ये उपयोगी ठरते
- होस्टिंगचा उपयोग वेबसाईटचे चांगले प्रदर्शन करण्यासाठी होतो
- चांगल्या वेबसाईट होस्टिंग चा उपयोग केला तर वेबसाईट क्रॅश होत नाही
- वेब होस्टिंग च्या मदतीने डेटा स्टोअर करणे सोपे जाते
- वेबसाईटच्या सुरक्षिततेसाठी चांगल्या होस्टिंगचा उपयोग करणे गरजेचे ठरते.
काही चांगल्या वेब होस्टिंग कंपनी
जर तुम्ही वेबसाईट किंवा ब्लॉक सुरू करण्याविषयी विचार करत असाल व तुम्ही जर चांगले वेबसाईट होस्टिंग कंपनी शोधत असाल तर तुम्ही पुढील वेब होस्टिंग कंपन्यांचा उपयोग करू शकता.
- Hostgator
- Bluehost
- Hostinger
- A2 hosting
- GoDaddy
- Site ground
सारांश
मला आशा आहे तुम्हाला आजच्या या लेखांमधून वेळ होस्टिंग म्हणजे काय याविषयी संपूर्ण माहिती मिळालेली असेल तर तुम्हाला आजचा हा लेख आवडला असेल तर तुम्ही हा लेख पुढे शेअर करा व जरी काही शंका किंवा प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा.
जर तुम्हाला होस्टिंग म्हणजे काय हे समजले असेल तर तुम्ही पुढील लेख वाचा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा