वांग्यामधील फांदी पोखरणारी अळी चे नियंत्रण आणि लक्षणे

वांग्यामधील फांदी पोखरणारी अळी / Brinjal stem borer : आपल्याला भारतीय उपखंडामध्ये वांग्या मधील फांदी पोखरणारे अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. वांग्या बरोबरच ही अळी बटाटा, टोमॅटो आणि मिरची ला देखील अटॅक करते. वांगी मधील फांदी पोखरणाऱ्या अळीचे शास्त्रीय नाव Euzophera perticella आहे. आजच्या या लेखात आपण फांदी पोखरणारी अळीचे लक्षणे आणि नियंत्रण जाणून घेऊया.

वांगी मधील फांदी पोखरणारी अळीचे नुकसान लक्षणे

1. ही अळी वांग्याच्या मुख्य शाखेमध्ये होल करून आत जाते व तिथून खोडाकडे प्रवास करते.

2. त्यामुळे वांग्याच्या शेंड्याना व पानांना योग्य अन्नपुरवठा होत नाही म्हणून ही पाने व शेंडे वाळतात

3. जुन्या वांग्याच्या झाडांची वाढ खुंटते व याचा परिणाम वांग्याच्या फळधारणे वरती होतो

4. जिथून फळ पोखरणाऱ्या अळीने फांदी मध्ये प्रवेश केला आहे ती जागा थोडी वेगळी दिसते व त्या जागेवरती फांदी जाड झालेली असते.

फळ पोखरणाऱ्या अळीचे जीवनमान

• अंड्याचा कालावधी हा दहा दिवसांचा असतो ज्यामध्ये कोवळ्या पानांवर आणि फांद्यांवर अंडी आढळून येतात

• अळीचा कालावधी हा 26 ते 58 दिवस असतो ज्यामध्ये पूर्ण वाढलेली अळी ही वीस मिलिमीटर पर्यंत असते व ही अळी सफेद कलरची असते

• अळीचे आयुष्यमान संपल्यानंतर ही अळी कोश कालावधीमध्ये जाते जे 09 ते 16 दिवसांचे असते

• कोश कालावधी संपल्यानंतर कोश मधून पतंग बाहेर येतात ज्यांचा रंग हा तपकिरी असतो.

• फांदी पोखरणाऱ्या अळीचे संपूर्ण आयुष्यमान हे 35 ते 76 दिवस असते.

फांदी पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

1. फांदी पोखरणाऱ्या अळीमुळे नुकसान ग्रस्त झालेले व त्यामुळे मेलेली वांग्याची झाडे वांग्याच्या शेतातून काढून दुसरीकडे नेऊन नष्ट करावीत

2. फांदी पोकरणाऱ्या अळीचे भक्षण करणाऱ्या Pristomerus euzopherae, Pristomerus testaceus या परपोषी कीटकांचे शेतात संगोपन करावे

3. अळीचे जीवनक्रम थांबवण्यासाठी हेक्टरी 1 अशा प्रमाणात प्रकाश सापळ्यांचा उपयोग करावा.

4. वांगी लावल्यानंतर एक महिन्यानंतर दर पंधरा दिवसांच्या अंतराने आपण पुढीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा स्प्रे घेऊ शकतो:

• Quinalphos 25 EC + नीम ऑईल

• Fenpropathrin 30 EC

• Thiodicarb 75 WP

आपल्याला वांगी पिकामध्ये विविध समस्यांचा सामना करावा लागतो आपण आपल्या समस्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला हे देखील कळवा व हा लेख आवडला असेल तर शेअर करा.

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा