मिरची मधील मर रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन

मिरची मधील महत्त्वपूर्ण रोगांपैकी एक रोग म्हणजे मर रोग. या रोगामुळे मिरचीच्या उत्पादनात घट होते व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. म्हणूनच, आजच्या या लेखामध्ये आपण मिरची मधील मर रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन जाणून घेऊया.

मिरची मधील मर रोग हा बुरशीच्या माध्यमातून पसरणारा रोग आहे ज्याचे शास्त्रीय नाव Pythium aphanidermatum आहे. या रोगामुळे मिरची ची रोपे मोठ्या प्रमाणात दगवतात.

मिरची मधील मर रोगाची लक्षणे

• मिरचीचे बीज अंकुरणे आधीच रोप मरते.

• नर्सरी मध्ये लावलेल्या मिरचीच्या बियांवर हा रोग प्रभाव करत असल्यामुळे बीज अंकुरण्याचे पर्सेंटेज कमी होते.

• मिरचीची खोडे सुकतात

• जर जमिनीमध्ये आद्रता 90 ते 100 च्या दरम्यान असेल व तापमान 20 अंश सेल्सिअस असेल तर हा रोग मोठ्या प्रमाणात पसरू शकतो 

• मिरची मधील मर रोग हा बियांद्वारे तसेच जमिनीद्वारे पसरतो

• मर रोगाने प्रभावित मिरचीची रोपे ही फिकट तपकिरी रंगाचे दिसतात.

• बीज अंकुरल्यानंतर तयार होणारे सुरुवातीच्या काळातील मिरचीचे रोपे मर रोगाने जास्त प्रभावित होतात.

मिरची मधील मर रोगाच्या उपाययोजना

• 50 किलो शेणखत बरोबर 2.5 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात P. fluorescens टाकावे

• Capton किंवा थायरमने 4 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी

• मिरची मध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी

• copper oxychloride ची 2.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात ड्रेंचींग करावी

• मिरची लागवडीसाठी योग्य अंतर वापरावे व खूप जवळजवळ मिरची लागवड करू नये

• नर्सरी मध्ये मिरचीला पाणी देताना जमिनीमधील योग्य आद्रता राखली जाईल याची काळजी घ्यावी

• नर्सरी मध्ये मिरचीचे रोपे तयार करत असताना जास्त सावलीची जागा टाळावी

सारांश

मिरची मधील मर रोगामुळे मिरचीची रोपे दगावण्याचा धोका वाढतो त्यामुळे मिरची मधील मर रोगाच्या वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे असते. तसेच मर रोग होऊ नये म्हणून काही उपाययोजना करणे देखील गरजेचे असते यांची माहिती आपण आजच्या या लेखात जाणून घेतली आहे.

आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेतले की आपण कशाप्रकारे मिरची वरील मर रोगाचे नियंत्रण करू शकतो व अधिकाधिक उत्पादन वाढवू शकतो जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख शेअर करा व व या लेखाच्या शेवटी आपल्याला हा लेख कसा आवडला याबद्दल कमेंट करा.

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा