मिरची वरील चुरडा मुरडा रोगाची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय

जर आपण मिरची वरील रोगांची माहिती घेतली तर आपल्याला समजेल की मिरची वरील चुरडा मुरडा रोगामुळे मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते व जर वेळीच चुरडा मुरडा रोगाचे लक्षणे ओळखले नाही तर मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होऊ शकते.

महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी मिरची लागवड केली जाते व मिरची वरील वायरस च्या माध्यमातून पसरणारा मुख्य रोग म्हणजे चुरडा मुरडा रोग. चुरडा मुरडा रोगाला इंग्रजीमध्ये Leaf curl disease म्हणतात. मिरची वरील हा रोग अत्यंत झपाट्याने वाढतो म्हणून या रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे ठरते.

मिरची वरील चुरडा मुरडा रोगाची लक्षणे

1. चुरडा मुरडा रोगामुळे मिरचीची पाने मध्यभागी वळतात व पानांचा आकार बदलतो

2. या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते व पानांचा आकार कमी राहतो

3. या रोगाचा प्रसार मुख्यतः सफेद माशी मुळे होतो म्हणून चुरडा मुरडा रोग रोखण्यासाठी सफेद माशीचे नियंत्रण करणे गरजेचे राहते

4. फुलांचे आयुष्यमान पूर्ण होण्याआधीच फुले गळतात व त्यामुळे मिरची उत्पादनात घट होते

5. मिरचीच्या पानावर फिक्कट हिरवा ते डार्क हिरवा कलरचे पॅचेस पडतात

6. मिरचीच्या पानांवर व फळांवर पिवळ्या कलरच्या टिपके पडतात

चुरडा मुरडा रोगावरती उपाय योजना

• चुरडा मुरडा हा एक व्हायरसच्या माध्यमातून निर्माण होणारा रोग आहे व बहुतांश वायरल रोगांवरती जैविक तसेच रासायनिक औषधे उपलब्ध नाहीत

• चुरडा मुरडा रोग रोखण्यासाठी यांत्रिकीकरण पद्धती तसेच पारंपरिक पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे ठरते

• चुरडा मुरडा रोग रोखण्यासाठी व या रोगाचा धोका कमी होण्यासाठी चांगल्या आणि निरोगी बीजांपासून निर्माण केलेले मिरचीची रोपे वापरावीत

• शेतामध्ये अलटून-पालटून वेगवेगळे पीक घ्यावीत व वर्षभर एकच पीक पीक घेणे टाळावे.

• ज्या रोपांवर चुरडा मुरडा रोग आढळून आला आहे अशी रोपे उपटून, दूर नेऊन जाळून टाकावीत

• चुरडा मुरडा रोगाचा प्रसार हा सफेद माशीमुळे होतो म्हणूनच सफेद माशी चे नियंत्रण करणे गरजेचे ठरते

नर्सरी मध्ये चुरडा मुरडा रोग नियंत्रणाचा उपाय

•150 ग्रॅम Trisodium orthriphosphate प्रति लिटर पाण्यात मिसळून त्यात मिरचीच्या बिया अर्धा तास भिजत घालाव्यात ज्यामुळे मिरचीच्या बिजांमधून पसरणारे रोग कमी होतात.

•बीज प्रक्रिया केलेली रोपे स्वच्छ पाण्याने धुवून तसेच वाळवून मगच नर्सरी मध्ये रोप निर्मितीसाठी वापरावीत.

•नर्सरी मध्ये लावण्यात आलेली रोपे ही नायलॉन जाळीने किंवा इतर पद्धतीने झाकलेली असावी जेणेकरून वेगवेगळ्या कीटकांद्वारे व्हायरल रोगाचा प्रसार होणार नाही

शेतामध्ये चुरडा मुरडा रोग नियंत्रणाचा उपाय

1. मिरचीची रोपे लावलेल्या प्लॉटच्या भोवती तीन ते चार सऱ्या ज्वारीच्या किंवा बाजरीच्या लावाव्यात जेणेकरून वेगवेगळ्या कीटकांद्वारे मिरचीच्या पिकावर रोगाचा धोका होणार नाही

2. चुरडा मुरडा रोग झालेली मिरचीची रोपे गोळा करून ती नष्ट करावीत

3. विविध रस शोषक कीटकांचा जसे की सफेद माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण dinethoate किंवा acephate या कीटकनाशकांचा उपयोग करू शकतो

4. मिरची लागवड करण्यापूर्वी जमिनीची मशागत करताना खोल नांगरट करावी

सारांश

मिरची वरील चुरडा मुरडा रोगावरती कोणत्याही प्रकारची रासायनिक कीटकनाशके उपलब्ध नाहीत. म्हणून जर एकदा मिरची वरती चुरडा मुरडा रोगाचा प्रभाव आढळून आला तर आपल्याला ती रोपे शेतातून काढून टाकणे फायद्याचे ठरते व मिरची वरती चुरडा मुरडा रोग येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे ठरते.

म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण मिरचीवरील चुरडा मुरडा रोगावरती करण्यात येणारे प्रतिबंधात्मक उपाय व त्याचे लक्षणे जाणून घेतली.

जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख शेअर करा व आपल्याला अजून कोणत्या पिकाची व कोणत्या रोगाची माहिती हवी आहे ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा.

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा