Dairy Farmers: विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये दुग्ध व्यवसाय प्रसारासाठी 400 कोटींची तरतूद, विखे पाटलांची माहिती

Dairy Farmers: सध्या दूध व्यवसाय मध्ये एक मोठी समस्या म्हणजे देशी गाईंचे संगोपन करणे व त्याद्वारे दुधाचे उत्पादनात वाढ करणे परंतु व्यवसाय पातळीवर भरीव कामगिरी करणे हे या क्षेत्रामध्ये अवघड झाले आहे व अशातच विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे .

पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेले माहितीनुसार विदर्भामधील 11 जिल्ह्यांमध्ये केवळ दहा लाख लिटर दुधाचे संकलन केले जाते व त्यामुळे दुधाच्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्यासाठी संबंधित जिल्ह्यांसाठी 400 कोटी रुपयांचा आराखडा निर्माण केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

अकरा जिल्ह्यांना चारशे कोटी विखे पाटलांची घोषणा

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या पशुसंवर्धन विभागांमध्ये बोलत असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित माहिती दिली. यावेळेस गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा तसेच सह आयुक्त शीतलकुमार मुकणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गोसेवा आयोगाला शक्य तितकी मदत करण्याची हमी राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या भाषणात दिली.

कार्यक्रमास भाषण देत असताना शेखर मुंदडा म्हणाले की देशामध्ये देशी गाईंच्या संगोपन करणे हे अत्यंत गरजेचे ठरलेले आहे व त्यासाठी देशभरातील सहा राज्यांमध्ये गोसेवा आयोग स्थापित करण्यात आलेले आहे. आतापर्यंत गोसेवा व गोरक्षण करत असताना राज्यातील 50 गोरक्षकांचा बळी केलेला आहे व त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत करण्याची हमी त्यांनी संबंधित कार्यक्रमात दिली.

असेच नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा

Havaman Andaj Maharashtra
Havaman Andaj Maharashtra

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा