Havaman Andaj: महाराष्ट्र राज्य मध्ये पुढील 24 तासांमध्ये ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता पंजाब डख यांच्यामार्फत वर्तविण्यात आलेली आहे. सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची कमतरता जाणवत आहेत व त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आलेला आहे म्हणूनच पंजाब डख यांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरू शकतो.
जर पुढील काही दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांवरती मोठे संकट वाढवू शकते व त्याचा डायरेक्ट परिणाम हा खरीप हंगामावरती दिसून येऊ शकतो म्हणूनच महाराष्ट्रातील ठिकाणी पाऊस व्हावा यासाठी शेतकरी वरूनराजा ची प्रार्थना करत आहेत.
लवकरच पावसाला सुरुवात | Havaman Andaj
पंजाब डख यांनी हवामान अंदाज सांगितलेला होता त्यानुसार महाराष्ट्रात 3 सप्टेंबर पासून ते 12 सप्टेंबर पर्यंत ठीक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला होता. तसेच या पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
बंगालच्या खाडीमध्ये 3 सप्टेंबर पासून ते 25 सप्टेंबर पर्यंत एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे व हवेच्या चक्रकार स्थितीमुळे महाराष्ट्रात ठीक ठिकाणी पाऊस होऊ शकतो असे मत पंजाबराव यांनी व्यक्त केले.
पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, दक्षिण महाराष्ट्र तसेच कोकण किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये दहा सप्टेंबर पर्यंत पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. सध्या पावसाअभावी पिके सुकलेले आहेत परंतु या पिकांसाठी जीवनदायी ठरणारा पाऊस पडू शकतो असा अंदाज पंजाबराव डख यांचे मार्फत देण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेले आहे हवामान अभ्यासाकांचे तसेच हवामान विभागाचे अंदाज चुकत आहे व त्यामुळे यावर्षी दुष्काळ पडतो की काय अशी चिंता शेतकऱ्यांना होत आहे परंतु पंजाब डख यांनी स्पष्ट शब्दांमध्ये यावर्षी चांगला पाऊस पडेल असे मत व्यक्त केलेले आहे.
दररोज व्हाट्सअप च्या माध्यमातून हवामान अंदाज मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा