IMD Update: हवामान तज्ज्ञांनी तसेच हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस पडण्यास सुरुवात होईल व सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो असा हवामान अंदाज वर्तवलेला होता त्यानुसार तीन सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ठीक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली.
ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र मध्ये पावसाने मोठा खंड घेतला होता व शेतकऱ्याच्या पिकांवर याचा मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे हा पाऊस पिकांसाठी नवसंजीवनी देणारा ठरू शकतो. या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाचू शकतो.
आजचा पाऊस अंदाज | Havaman andaj
मान्सून चा व्यास हा हिमालयाच्या पायथ्याशी असल्यामुळे आज पण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र मध्ये काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली असली तरी अजून पण काही भागांमध्ये उष्णतेचा चटका वाढलेला बघायला मिळत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्र मध्ये तापमानात वाढ झालेली बघायला मिळत आहे.
आज नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच लातूर आणि धाराशिव मध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो असा अंदाज देण्यात आलेला आहे. विदर्भामधील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
सध्या महाराष्ट्रातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहे त्यामुळे महाराष्ट्रात लवकरात लवकर पाऊस पडावा यासाठी शेतकरी वरून राजाची प्रार्थना करत आहेत.
दररोज चा हवामान अंदाज मोफत व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून लगेच जॉईन करा.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा