Havaman Andaj: पुढील 24 तासांमध्ये भयंकर गारपिटीचा इशारा, हे आहेत जिल्हे

Havaman Andaj: पंजाबराव डख यांनी पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्र मध्ये पावसाला सुरुवात होईल असा अंदाज केलेला आहे त्यांनी सांगितलेला अंदाजानुसार दहा तारखेपर्यंत महाराष्ट्र मधील वातावरण कोरडे राहणार होते आणि त्यानंतर 11 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत हवामान अंदाजानुसार पाऊस पडणार होता.

पंजाबराव डक यांच्या विषयी सांगायचे झाले तर ते महाराष्ट्रातील एक लोकप्रिय हवामान तज्ञ आहे ज्यांचा अवकाळी पावसाविषयीचा हवामान अंदाज बऱ्याच वेळेस खरा ठरतो आता पंजाबराव यांनी चालू फेब्रुवारी महिन्यामध्ये पावसाची दिनांक सांगितलेली आहे त्याचबरोबर त्यांनी अवकाळी पावसाच्या गारपीटीचा इशारा दिलेला आहे.

Havaman Andaj: पंजाबराव यांचा गारपिटीचा इशारा

पंजाबराव यांनी 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना पावसाचा इशारा दिलेला आहे यामध्ये मुख्यतः पूर्व विदर्भामध्ये गारपीट होईल असा अंदाज त्यांनी वर्तवलेला होता त्यानुसार दहा फेब्रुवारी पासून मध्यरात्रीपासून वातावरणामध्ये बदल होण्यास सुरुवात होईल आणि ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान विविध भागांमध्ये पाऊस पडेल.

महाराष्ट्र मध्ये मुख्यता पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये संबंधित तारखे दरम्यान पाऊस पडेल आणि हा पाऊस नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पटेल आणि काही भागात गारपीट देखील होणार आहे नंतर हा पाऊस चांदोला बाजार, वाशिम, पुसद, अकोला, अमरावती, हिंगोलीच्या काही भागांमध्ये सरकणार आहे.

याचबरोबर परभणी आणि बुलढाण्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जळगाव मध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि संभाजीनगर मध्ये तुरळक भागांमध्ये पाऊस पडू शकतो.

कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पंजाबराव यांनी पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष टरबूज तसेच खरबूज उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे कारण दहा तारखे नंतर संपूर्ण देशभरात उन्हाचा पारा वाढायला सुरुवात होईल आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच इतर भागांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे.

पंजाबराव यांनी शेवटी हवामान अंदाज सांगताना सांगितले की अकरा तारखेपासून फक्त पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे मराठवाडा आणि इतर भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्याचबरोबर जर वातावरणामध्ये बदल झाला तर परत एक डिटेल हवामान अंदाज आता मेसेज पाठवला जाईल.

हे पण नक्की वाचा: गारपिटीचा सुरवात झाली, येथे पसरणार पाऊस, हवामान खाते अंदाज

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा