IMD Update: पुढील 48 तासात जोरदार गारपिटीचा इशारा, जिल्ह्यांची नावे जाहीर

IMD Update: पुढील 48 तासांमध्ये जोरदार गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे वातावरणामध्ये बदल होऊन बऱ्याच ठिकाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे आणि यासंदर्भात जिल्ह्यांची नावे जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे आजच्या या हवामान अंदाज मध्ये आपण पुढील 48 तासात कुठे कुठे पाऊस पडू शकतो याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी दिलेला माहितीनुसार दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील वातावरण कोरडे राहण्याचा इशारा त्यांनी दिलेला होता परंतु 11 तारखेपासून ते 11 तारीख, 12 तारीख 13 आणि 14 फेब्रुवारी मध्ये पाऊस पडण्याचा अंदाज त्यांनी दिलेला आहे सध्या विविध पिकांची पीक काढणी चालू आहे आणि त्याच अनुषंगाने पंजाबराव यांनी दिलेला हा हवामान अंदाज महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

IMD Update: पुढील 48 तासात गारपिटीचा इशारा

पंजाबराव डख हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय हवामान तज्ञ आहे आणि बऱ्याच वेळा त्यांचा अवकाळी पावसाविषयीचा अंदाज खरा ठरतो म्हणूनच शेतकऱ्यांचा त्यांचा वर पावसा विषयी विश्वास बनलेला आहे. आता पंजाबराव डख यांनी 11 तारखेपासून पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भात तसेच मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा इशारा दिलेला आहे.

पूर्व विदर्भाच्या काही भागांमध्ये गारपीट होऊ शकते असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे महाराष्ट्र बरोबरच आपल्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मध्ये देखील गारपीट होऊ शकते असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो असा हवामान अंदाज आहे

नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. काही भागांमध्ये गारपीट होऊ शकते असा अंदाज आहे. नंतर हा पाऊस पश्चिम विदर्भाकडे सरकणार आहे पश्चिम विदर्भामध्ये अकोला, अमरावती, वाशिम, पुसद, हिंगोली या भागांमध्ये ठीक ठिकाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे.

विदर्भ बरोबर परभणी आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र मध्ये दहा तारखेच्या संध्याकाळपासूनच वातावरणामध्ये बदल होण्यास सुरुवात होईल आणि 11 तारखेच्या सकाळपासून काही भागांमध्ये पाऊस पडण्यास सुरुवात होईल. हा पाऊस महाराष्ट्रात सर्व दूर नसला तरी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे.

पंजाबराव यांनी सांगितले की येणाऱ्या काही दिवसांमध्ये हवेमध्ये उष्णतेचा पारा वाढलेला बघायला मिळेल. आणि पाऊस पडणे विषयाचा अंदाज ओळखणे विषयी त्यांनी सांगितले की जेव्हा हवेची वाळवट तयार होईल तेव्हा पाच दिवसानंतर पाऊस पडू शकतो.

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा